धक्कादायक!  ट्रॅव्हल्स चालकाकडून पुण्यात आलेल्या महिलेचे अपहरण करून बलात्कार

बाहेर गावावरून पतीसोबत पुण्यात आलेल्या एका दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्येच झोपण्यास सांगून ट्रॅव्हल्स चालकाने अचानक ट्रॅव्हल्स कात्रज परिसरात नेहून महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

    पुणे : बाहेर गावावरून पतीसोबत पुण्यात आलेल्या एका दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्येच झोपण्यास सांगून ट्रॅव्हल्स चालकाने अचानक ट्रॅव्हल्स कात्रज परिसरात नेहून महिलेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पती वॉशरूमला जातच त्याने हे कृत्य केले आहे.

    याप्रकरणी चालक नवनाथ शिवाजी भोंग (38) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 21 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला वाशीम जिल्ह्यातील आहे. तर आरोपी हा एका खासगी ट्रॅव्हल्सवर चालक आहे. महिला मध्यरात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पुण्यात आली होती. तिचे पती देखील सोबत होते. दरम्यान पुण्यात नवीन असल्याने ते झोपण्यासाठी खोली शोधात होते. यावेळी भोंगने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्ये झोपण्यास सांगितले. दोघेही नवीन असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळाने महिलेचे पती वॉशरूमला गेले. त्याचदरम्यान या ट्रॅव्हल्स चालकाने ट्रॅव्हल्समधून महिलेचे अपहरण केले. स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात फुटपाथवर नेहून महिलेवर बलात्कार केला. तर पुन्हा बस कात्रज परिसरात नेली आणि तेथील फुटपाथवर दुसऱ्यांदा बलात्कार केला. दरम्यान महिलेचा तिला शोधत होता. पण, बस व पत्नी न सापडल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.