पुण्यातील महिलेचा विनयभंग; कपील शर्मावर गुन्हा दाखल

पुण्यातील एका महिलेला वारंवार फोनद्वारे संपर्क साधून त्यांच्याशी अश्लील बोलत विनयभंग केल्याप्रकरणी कपील शर्मा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा परिसरात हा प्रकार घडला आहे.

    पुणे : पुण्यातील एका महिलेला वारंवार फोनद्वारे संपर्क साधून त्यांच्याशी अश्लील बोलत विनयभंग केल्याप्रकरणी कपील शर्मा नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरवडा परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात एका २७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार कपिल शर्मा नामक एका अनोळखी व्यक्तीवर भादवी कल ३५४, ३५४ (अ) ३५४(ड) ५०४ आणि ५०९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार या घोरपडी परिसरात राहण्यास आहेत. तर कल्याणीनगर भागात त्यांचे ऑफिस आहे. २२ नोव्हेंबर रोजी त्या ऑफिसमध्ये असताना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. “मै कपिल शर्मा,” बात कर रहा हू, पहचाना नही क्या ? उस दिन तो नाईट को ओयो हॉटेल मे मिले थे, ? असे बोलून त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न केली.

    दरम्यान, त्यांनी हा प्रकार पतीला सांगितला. महिलेच्या पतीने संबंधित क्रमांकावर फोन केला. तसेच, त्यांना विचारणा केली असता त्यांना देखील या शर्माने शिवीगाळ केली. तेरी वाइफ ओयो मे जाती है, गलत काम करती है, इसको देखो असे म्हणत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर महिलेने येरवडा पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.