…अन् महिलेच्या खुनाची झाली उकल; जुगार खेळण्यासाठी वृद्ध महिलांना लुटणारा जेरबंद

जुगार खेळण्यासाठी वयोवृद्ध महिलांवर प्राणघातक हल्ला करून दागिने लुटणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. जून महिन्यात एका महिलेची लूटमार करताना खून केल्याची कबुलीही संशयिताना तपासादरम्यान दिली आहे.

    पंचवटी : जुगार खेळण्यासाठी वयोवृद्ध महिलांवर प्राणघातक हल्ला करून दागिने लुटणाऱ्या संशयिताला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले आहे. जून महिन्यात एका महिलेची लूटमार करताना खून केल्याची कबुलीही संशयिताना तपासादरम्यान दिली आहे.

    शंकुतला दादा जगताप (६५, रा. नवीन सामनगाव रोड) या आपल्या सव्र्व्हेश्वर क्लॉथ स्टोअर्समध्ये असताना याठिकाणी एका संशयिताने येऊन साडीच्या फॉलची मागणी करत शंकुतला जगताप यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत १ लाख २० हजार रुपयांचे दागिने काढून नेल्याची घटना घडली होती. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासून आणि तांत्रिक विश्लेषणच्या आधारे गुन्हा करणाऱ्या संशयित आरोपीची गोपनीय बातमीदारामार्फत ओळख पटविण्यात यश मिळविले. या संशयिताचे नाव विशाल प्रकाश गांगुर्डे असे असून, तो जेलरोड परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन संशयितांचा शोध घेतला मात्र, तो फरार झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

    तपासादरम्यान चोरी केल्याची दिली कबुली

    संशयित आरोपी वेष बदलून जागा बदलत असल्यनो पोलिसांसमोर आव्हान होते. अनेक ठिकाणी शोध घेतल्यानंतर संशयित कसारा येथे असल्याची माहिती सहा. बागूल यांना मिळाताचा त्यांनी संशयिताला ताब्यात घेतले.