महिला पोलिसाची पतीला मारहाण ; दहिवडी पोलिसांत गुन्हा नोंद

वडगाव, ता. माण येथील अतुल ओंबासे यांना मारहाण करणाऱ्या वडूज पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस राणी खाडे ओंबासे यांनी चक्क आपल्या पतीलाच मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सासूने दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मारहाण करणाऱ्या राणी ओंबासे यांच्या भावाविरोधात विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दहिवडी: वडगाव, ता. माण येथील अतुल ओंबासे यांना मारहाण करणाऱ्या वडूज पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस राणी खाडे ओंबासे यांनी चक्क आपल्या पतीलाच मारण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सासूने दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मारहाण करणाऱ्या राणी ओंबासे यांच्या भावाविरोधात विनयभंगाचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राणी खाडे ओंबासे यांचा भाऊ प्रमोद खाडे याने घरात घुसून अतुल ओंबासे यांना मारहाण केली. यावरून अतुल यांच्या आईने फिर्याद नोंदवली आहे. मारहाण होत असताना फिर्यादीने प्रमोद खाडे याला अडवले असता धमकी देत शिवीगाळ करत गळ्यातील बोरमाळ व मणी तोडून घेतले. कानाखाली मारून फिर्यादीची साडी ओढून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. यावरून प्रमोद खाडे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.

    प्रमोद खाडे व राणी ओंबासे यांच्यासोबत आलेल्या चार ते पाच जणांनी अतुल ओंबासे यांना दगड आणि लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी केले. तसेच नातू प्रभात यास घेऊन गेले. फिर्यादीची सून राणी खाडे ओंबासे यांनीही स्वतः च्या पतीस अतुल ओंबासे यास मी तुझा खून करण्यासाठी आली आहे, असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पो. उपनिरीक्षक स्वाती धोंगडे या करत आहेत.