Pune Woman beaten
Pune Woman beaten

    पिंपरी : घरात आलेला क्रिकेट बॉल देण्यास नकार दिला म्हणून 4 ते 5 जणांनी महिला व तिच्या पुतण्याला बॅटने मारहाण केली आहे. ही घटना रविवारी (दि. 19) पिंपरीतील संत तुकारामनगर येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात महिलेने फिर्याद दिली असून, ओंकार सुतार, प्रथमेश बोंडे, श्रेयस राणे, निखिल थिटे, फुलारीइरान सर्व रा. पिंपरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    फिर्यादी यांना हाताने व बॅटने मारहाण
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेट खेळत असताना आरोपी मुलांचा बॉल ४ वेळा फिर्यादी यांच्यात घरात गेला. त्यांच्या या सततच्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांनी बॉल देण्यास नकार दिला. याचा राग येऊन 5 ही जणांनी फिर्यादी यांना हाताने व बॅटने मारहाण केली. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या फिर्यादी यांच्या पुतण्याला ही बॅट व स्टंप ने मारहाण करीत जखमी केले. यावरून पिंपरी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.