दुकानदाराकडून महिला कामगाराचा विनयभंग, पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस; आरोपीवर गुन्हा दाखल

सफाई कामगार महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पेरणे फाटा येथील दुकानदारावर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार पेरणे फाटा येथे घडला आहे.

    पुणे : सफाई कामगार महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पेरणे फाटा येथील दुकानदारावर लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा प्रकार पेरणे फाटा येथे घडला आहे. याबाबत ३५ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी शॉपचा मालक साहेबराव राठोड (महाराज) वय- 50 रा. बाळाबाई तांडा, अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोडचे पेरणे फाटा येथे शॉप आहे. याठिकाणी तक्रारदार महिला साफसफाई करण्याचे काम करते. २७ ऑक्टोबर रोजी महिला राठोड याच्या दुकानात साफसफाई करण्यास गेल्या होत्या. त्यावेळी राठोडने महिलेशी गैरवर्तन केले. महिलेने त्याला विरोध केला असता त्याने ‘हा शॉप तुझ्या नावावर करतो’ असे म्हणत स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. घाबरलेल्या महिलेने पोलिसांत धाव घेत आरोपी राठोड विरोधात तक्रार दिली. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करत आहेत.