अ‍ॅप डाउनलोड करायला लावले अन्…; सायबर चोरट्यांकडून महिलांची साडे नऊ लाखांची फसवणूक

शेअर मार्केट आणि पार्ट टाइम नोकरीचे आमिषाने सायबर चोरट्याने दोघांची ९ लाख ६७ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

    पुणे : शेअर मार्केट आणि पार्ट टाइम नोकरीचे आमिषाने सायबर चोरट्याने दोघांची ९ लाख ६७ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
    डॉ. महिलेची फसवणूक…
    सायबर चोरट्यांनी डॉक्टर महिलेलाच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिषाने ७ लाख ८४ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या ३८ वर्षीय डॉक्टर महिलेने भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यानच्या काळात घडली आहे.
    सायबर चोरट्याने महिलेला व्हाट्सअप ग्रुपमध्ये सहभागी केले. त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याचे सांगितले. यानंतर त्यांच्या मोबाईलमध्ये एक अॅप डाउनलोड करायला लावले. त्यात ७ लाख ८४ हजार गुंतवायला भाग पाडले. दरम्यान, गुंतवणूक केलेली रक्कम परत मागितले असता, त्यांना जमा असलेल्या रक्कमेच्या २० टक्के रक्कम भरायला सांगिले. तेव्हा त्यांना फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) झिने करत आहेत.
    पार्ट टाईम नोकरीच्या आमिषाने फसवणूक
    टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची १ लाख ८३ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी वाघोली येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेने लोणीकंद पोलिसांत तक्रार दिली आहे. ही घटना ४ ते ९ एप्रिल दरम्यानच्या काळात घडली. सायबर चोरट्याने महिलेला पार्ट टाइम नोकरी असल्याचे सांगून टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळेल असे सांगितले. नंतर महिलेला ३ हजार गुंतवायला लावून ४ हजार८०० रुपये परतावा देऊन विश्वास संपादन केला. यानंतर विविध बँक खात्यावर १ लाख ८३ हजार पाठवायला लावून महिलेची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक ढाकणे तपास करत आहेत.