ईडी व भाजपाच्या विरोधात महिला काँग्रेसचा दुपारी ईडी कार्यालयावर निषेध मोर्चा

नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी ईडी कार्यालयात राहुल (Rahul Gandhi) गांधींना चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ शेकडो पक्ष कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मुंबईत सुद्धा काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांनी सोमवारी व मंगळवारी ईडी कार्यालयावर (ED Office) धडकल्याने वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, आज दुपारी सुद्धा केंद्रातील भाजप व ईडीच्या (BJP and ED) विरोधात महिला काँग्रेस (Women Congress) ईडी कार्यालयावर निषेध मोर्चा काढणार आहेत.

    मुंबई : नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी ईडी कार्यालयात (ED Office) राहुल गांधींची सध्या चौकशी सुरु आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सलग होत असलेली चौकशी, तसेच देशात ईडीच्या धाडी व ईडीच्या दडपशाही विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. सोमवार, मंगळवार, व बुधवारी एकीकडे राहुल गांधींची ईडी चौकशी (Rahul Gandhi ED Inquiry) सुरु असतानाच देशभरात मात्र काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. तसेच केंद्र सरकार तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा निषेध करत आंदोलन केले. नॅशनल हेराल्ड (National Herald) प्रकरणी ईडी कार्यालयात राहुल (Rahul Gandhi) गांधींना चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ शेकडो पक्ष कार्यकर्त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयावर मोर्चा काढला. मुंबईत सुद्धा काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांनी सोमवारी व मंगळवारी ईडी कार्यालयावर (ED Office) धडकल्याने वातावरण चांगलेच तापले होते. दरम्यान, आज दुपारी सुद्धा केंद्रातील भाजप व ईडीच्या (BJP and ED) विरोधात महिला काँग्रेस (Women Congress) ईडी कार्यालयावर निषेध मोर्चा काढणार आहेत.

    दरम्यान, सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे मोदी सरकारचे (Narendra Modi) षडयंत्र असून त्याविरोधात मुंबई आणि नागपूर येथील ईडीच्या ( Mumbai and Nagapur ED office) कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात केंद्रातील भाजपा सरकार राजकीय सुडबुद्धीने वागत आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा सर्रास गैरवापर केला जात असून त्याचाच एक भाग म्हणून खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठीच सोनिया व राहुल यांना ईडीने नोटीस बजावली आहे. यांच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे मागील चार दिवसांपासून  आंदोलन व निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. आज दुपारी सुद्धा केंद्रातील भाजप व ईडीच्या विरोधात महिला काँग्रेस मोर्चा काढणार आहे. दुपारी 2.00 वाजता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांच्या उपस्थितीत व महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्याताई सव्वालाखे (Sandhya Sawalakhe) यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ईडी कार्यालयावर महिलांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.