पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी महिलांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी (दि.13) पालिका सभागृहात दुपारी 12 वाजता अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती महिलांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती पालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.

    महाबळेश्वर : पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी (दि.13) पालिका सभागृहात दुपारी 12 वाजता अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती महिलांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती पालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.

    महाबळेश्वर पालिकेत दहा प्रभागातून 20 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. यामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन व अनुसूचित जमातीसाठी एक अशाप्रकारे तीन जागा राखीव आहेत. प्रभाग सहा व प्रभाग आठ या प्रभागातून प्रत्येकी एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. यापैकी कोणता प्रभाग हा महिलांसाठी राखीव आहे, याची सोडत उद्या काढण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्र. 5 हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे.

    याही एकमेव जागा ही सर्वसाधारण आहे की महिला उमेदवारासाठी राखीव आहे. हे सोडत काढून ठरविण्यात येणार आहे. तीन जागांचे आरक्षण निश्चित झाल्यानंतर उरलेल्या प्रत्येक प्रभागात एक जागा महिलांसाठी राखीव राहणार आहे, अशी माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी दिली.