konkan railway mega block

मेन लाईन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल हार्बर लाईन सेक्शनसह ट्रान्स-हार्बर लाईन आणि बीएसयू लाईनच्या उपनगरी सेक्शनमध्ये मेगा ब्लॉक असणार नाही. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

    मुंबई – मुंबईची रेल्वे लोकल (Railway local) ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. कारण या रेल्वे लोकलने दररोज लाखो मुंबईकर कामासाठी ये-जा करत असतात. परंतू प्रत्येक रविवारी मध्य तसेच पश्चिम रेल्वेवर विविधा यांत्रिकी कामांसाठी मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात येतो. सकाळी ११.३० ते सांयकाळी ४.०० वाजेपर्यंत प्रत्येक रविवारी (Sunday) घेण्यात येतो. त्यामुळं रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांना बाहेर फिरायला जाण्यावर काहीशी बंधनं येतात. तसेच मेगा ब्लॉकमुळं अनेक मुंबईकर घराबाहेर पडत नाहीत. पण आता एक मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. (work news there is no mega block on central railway on sundays comfort for passengers)

    रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक नाही

    दरम्यान, मध्य रेल्वेच्या वाडीबंदर यार्ड आणि पनवेल रीमॉडेलिंगचा नाईट ब्लॉक पाहता, दिनांक ८.१०.२०२३ रोजी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण सेक्शन मेन लाईन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल हार्बर लाईन सेक्शनसह ट्रान्स-हार्बर लाईन आणि बीएसयू लाईनच्या उपनगरी सेक्शनमध्ये मेगा ब्लॉक असणार नाही. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. असं प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग, मुख्यालय, मध्य रेल्वे, मुंबई यांनी जारी केले आहे.