
काम करा, उगाच पदाची जागा अडवू नका, असा परखड सल्ला मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांना दिला. तसेच पक्ष सर्वच निवडणुक लढविणार असुन, कामाला लागा असेही त्यांनी आदेश दिले.
पुणे : काम करा, उगाच पदाची जागा अडवू नका, असा परखड सल्ला मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांना दिला. तसेच पक्ष सर्वच निवडणुक लढविणार असुन, कामाला लागा असेही त्यांनी आदेश दिले. पुणे शहरातील मनसेचे शाखा अध्यक्ष, उप विभाग अध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि इतर अध्यक्षांकरीता कार्यशाळा आयाेजित केली होती. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
पक्ष सर्वच निवडणुका लढणार आहे. त्यादृष्टीने कामाला लागा. उगाच पदे घेऊन ती अडवू ठेवू नका. काम करताना पैसा लागताेच असे नाही. पैशाशिवाय करता येणारी अनेक कामे आहेत, ती करा, लाेकांमध्ये जा, असा सल्ला दिला. यानंतर पक्षाच्या वतीने धनंजय खाडीलकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मतदान प्रक्रीयेविषयी त्यांनी पुर्ण माहीती दिली. मतदार यादीवर कसे काम करावे, पक्षाच्या वतीने भरून घ्यावयाचे अर्ज कसे भरून घ्यावेत, नागरीकांशी कश्या पद्धतीने संवाद साधावा यासंदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी नेते बाबु वागसकर, अनिल शिदाेरे, बाळा शेडगे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, महीला अध्यक्षा वनिता वागसकर, अजय शिंदे, वसंत माेरे आदी उपस्थित हाेते.