देशात कामगारांची पिळवणूक केली जात आहे- सामजिक कार्यकर्ता माधवी जोशी 

गेले काही वर्षे इज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली कामगारांवर बंधने घालणे, त्यांचे हक्क हिरावणे, त्यांना वेठीस धरण्याची यंत्रणा पुन्हा एकदा देशात डोके वर काढत आहे. देशात कामगारांची पिळवणूक केली जात आहे. जनरल मोटर्स कामगार याच व्यवस्थेचा शिकार झाले आहेत, अशी भावना कर्जत येथील सामाजिक कार्यकर्त्या माधवी नरेश जोशी यांनी व्यक्त केली 

    वडगाव मावळ  : गेले काही वर्षे इज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली कामगारांवर बंधने घालणे, त्यांचे हक्क हिरावणे, त्यांना वेठीस धरण्याची यंत्रणा पुन्हा एकदा देशात डोके वर काढत आहे. देशात कामगारांची पिळवणूक केली जात आहे. जनरल मोटर्स कामगार याच व्यवस्थेचा शिकार झाले आहेत, अशी भावना कर्जत येथील सामाजिक कार्यकर्त्या माधवी नरेश जोशी यांनी व्यक्त केली
    मावळ तालुक्यातील  जनरल मोटर्सच्या कामगारांनी संपूर्ण कुटूंबासह त्यांच्या नोकरीच्या मागण्यांसाठी साखळी उपोषण पुकारले आहे.या पुकारलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देत आंदोलनाला पाठिंबा दिला त्यावेळी त्या बोलत होत्या
    या देशात अनेक मल्टिनॅशनल कंपन्या येतात. ज्या भागात कंपनी येते त्या भागात रोजगार उपलब्ध होईल, दळणवळणाची साधने येतील या अपेक्षेने आपण सर्वच आनंदी असतो. मात्र जेव्हा कंपनी सर्व काही दुसर्‍या कंपनीला विकून जाते, त्यावेळी कंपनीच्या कामगारांच्या नोकरीवर गदा येते आणि दुर्दैवाने त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आज जनरल मोटर्सचे कामगार या दुर्दैवी परिस्थितीतून जात असल्याची गंत त्यांनी व्यक्त केली
    गेल्या काही महिन्यांपासून कंपनीचे कामगार विविध माध्यमातून लढा देत आहेत. त्यांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष करत आहे. सरकार याकडे लक्ष देत नाही, कामगार मंत्री एककलमी निर्णय घेतात आणि या कामगारांना तोंड देता येत नाही म्हणून परस्पर निर्णय जाहीर करतात. हे अत्यंत अनाकलनीय आहे. मात्र या संकटाच्या परिस्थितीत माधवी ताई आपल्या सोबत खंबीर पणे उभ्या आहेत त्या आपल्याला पूर्ण सहकार्य करतील आणि आपली बाजू मांडतील माधवीताईनी तेथील जे काही कामगारांचे निधन झाले आहेत त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आणि पुढे देखील या दोन दिवसात ठोस पाऊल उचलले गेले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचे आवाहन केले आहे.
    यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष संदीप बेगडे , रा.काँ.सा. न्या. विभाग कार्याध्यक्ष किरण ओव्हाळ,  उद्योजक प्रफुल्ल रोकडे  सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष गणेश पाटोळे, उपाध्यक्ष अजय भालेराव, उपाध्यक्ष  आशिष भालेराव व इतर मान्यवर उपस्थित होते.