वर्ल्ड कॉमर्स डे तळमावले महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा

दरवर्षी जगभरात १ ऑगस्ट रोजी वर्ल्ड कॉमर्स डे साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर तळमावले महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    सातारा : दरवर्षी जगभरात १ ऑगस्ट रोजी वर्ल्ड कॉमर्स डे साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर तळमावले महाविद्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    कामगारांच्या प्रती व त्यांनी पुरवलेल्या सेवेच्या प्रती कृतज्ञता म्हणून हा दिवस ‘साजरा करतात. वाणिज्य शाखेतून बाहेर पडलेले युवक -युवती जगाच्या पाठीवर कुठेही आपले अस्तित्व सिद्ध करू शकतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्यांच्यात विविध गुण वाढीस लागावेत. तसेच कामगारांच्या त्यागाचे स्मरण व्हावे. या हेतूने साजरा करण्यात आला. गत दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ‘कॉमर्स डे’ साजरा करता आला नव्हता. त्यामुळे या कार्यक्रमाला विद्याथ्र्यांचा उत्साह अमाप होता. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन विभागप्रमुख डॉ. साळुंखे यु. ई. , प्रा. रणजित लिधडे व प्रा.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी केले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण गाडे होते.

    प्राचार्य डॉ. अरुण गाडे म्हणाले, बदलत्या आव्हानांचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी झपाट्याने बदलणाऱ्या माहिती तंत्रज्ञान युगात ज्ञान अद्ययावत ठेवणे काळाची गरज आहे. उज्वल भविष्य निर्माणासाठी सोशल मीडियाशी जुळवून घेताना सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणू व प्रवृत्तीस आळा या शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी सांगितलेल्या पंचसूत्रीपासून दूर जाता कामा नये. आजच्या ऑनलाईनच्या जमान्यात माणसामाणसांतील, कुटुंबातील एकोप्याचे, प्रेमाचे बंध अतूट राहायला हवेत. संस्काराची श्रीमंती आपल्या व्यक्तिमत्वाला झळाळी प्राप्त करुन देते. यावेळी प्रश्नमंजूषा,वक्तृत्व स्पर्धा,वादविवाद, निबंध स्पर्धा, व विविध फनी गेम्समध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थी -विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच रायगड, प्रतापगड याठिकाणी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आयोजित राष्ट्रीय सेवा योजना श्रमसंस्कार शिबीरात सहभागी स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.सदरच्याकार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी व गुरुदेव कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. याकामी, प्राचार्य डॉ. अरूण गाडे यांच्या नेतृत्वाखाली वाणिज्य विभाग व गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अथक असे परिश्रम घेतले. पुनम चाळके यांनी प्रास्ताविक व स्वागत डाँ. यु .ई.साळुंखे यांनी केले.कु.करीश्मा पाचूपते हीने सूत्रसंचालन केले. शुभांगी चाळके हीने आभार मानले.