सलग १२ तास कीर्तनसेवा; बाजीराव महाराज बांगर यांची ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’मध्ये नोंद

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-खडकी येथील प्रसिद्ध कीर्तनकार, शिवचरित्र कथाकार हभप बाजीराव महाराज बांगर (Bajirao Maharaj Bangar) यांनी नारायणगाव येथे सलग १२ तास २० मिनिटांचे कीर्तन करून जागतिक विक्रम केला केला आहे. त्यांची 'वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया' (World Records India) मध्ये नोंद करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे संपूर्ण आंबेगाव तालुक्यातून कौतुक होत आहे.

    मंचर : आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-खडकी येथील प्रसिद्ध कीर्तनकार, शिवचरित्र कथाकार हभप बाजीराव महाराज बांगर (Bajirao Maharaj Bangar) यांनी नारायणगाव येथे सलग १२ तास २० मिनिटांचे कीर्तन करून जागतिक विक्रम केला केला आहे. त्यांची ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’ (World Records India) मध्ये नोंद करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे संपूर्ण आंबेगाव तालुक्यातून कौतुक होत आहे.

    विविध विषयांवर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. कीर्तनावर वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचे आपण ऐकलं नसेल. कुठलाही सराव नसताना गेली बारा वर्षांपासून कीर्तन सेवा देणारे शिवचरित्र कथाकार हभप बाजीराव महाराज बांगर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून प्रेरणा घेत पावनखिंडीच्या लढाईत सतरा तास खिंड लढविणाऱ्या मावळ्यांची लढाई हीच त्यांची प्रेरणा ठरली.

    १७ तास मावळे लढाई करू शकतात, तर आपणही १२ तास कीर्तन करू शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला. त्यानंतर बांगर महाराज यांनी सलग बारा तास कीर्तन करण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे प्रमुख पवन सोळंकी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सहभागासाठी हिरवा कंदील दर्शविला.

    कीर्तनसेवेसाठी २२ जणांची साथ

    या वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियासाठी हभप बाजीराव महाराज बांगर यांना किरण महाराज बनकर, माऊली महाराज कुंजीर, नितीन महाराज सुक्रे, विशाल महाराज बांगर, विठ्ठल महाराज पोपळघट, विठ्ठल जाधव (चोपदार) व चंद्रकांत निकम (विणेकर) यांच्यासह २२ जणांची साथ लाभली. याचबरोबर टाळकरी, गायक, वादक यांनीही साथ दिली.