आरवडेत उभारला जगातील पहिला टाकाऊ प्लास्टिकचा बंधारा ; खुजगावच्या सचिन देशमुख या सैनिक तरुणाचे संशोधन

प्लास्टिक ही भारतासह संपूर्ण जगासमोर एक मोठी समस्या बनली आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. सतत होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सचिन देशमुख या जवानाने टाकावू प्लास्टिक वर संशोधन केले आहे.हा बंधारा एका महिन्यात तयार केला आहे.

    तासगाव : आरवडे(ता.तासगाव)येथे जगातील पहिला टिकाऊ प्लास्टिक वापरून तयार केलेला बंधारा बांधण्यात आला आहे.या बंधाऱ्यामुळे प्लास्टिक मुक्तितून पर्यावरण संवर्धन आणि शेतीला पाणी असा तिहेरी हेतू साध्य झाला आहे.खुजगाव (ता.तासगाव)येथील आणि सध्या भारतीय सैन्यात सेवेत असणाऱ्या सचिन देशमुख या तरुणाने हे संशोधन केले आहे.या बंधाऱ्याचे उद्घाटन व पाणी पूजन गिरीश चितळे,सुरेश कुंभार, वर्षाराणी पाटील सरपंच यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
    प्लास्टिक ही भारतासह संपूर्ण जगासमोर एक मोठी समस्या बनली आहे. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. सतत होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सचिन देशमुख या जवानाने टाकावू प्लास्टिक वर संशोधन केले आहे.
    हा बंधारा एका महिन्यात तयार केला आहे. शहरी व ग्रामीण भागात भेडसावणारी टाकावू प्लॅस्टिकची समस्या व दुष्काळी भागात भेडसावणारा पाण्याचा प्रश्न यावर एकत्रित पर्याय म्हणजे हा बंधारा होय.यासाठी 17 .50 टन प्लास्टिक वापरण्यात आले आहे.व एका बंधाऱ्यामुळे 15 लाख लिटर पेक्षा जास्त पाणीसाठा होऊ शकतो.या एका बंधाऱ्यामुळे सरासरी 500 गावे प्लास्टिक प्रदूषणापासून मुक्त होऊ शकतात.
    असा तयार झाला बंधारा
    सदरचा बंधारा लोकवर्गणीतून तयार करण्यात आला आहे. आरवडे – मांजर्डे रोडवर असणाऱ्या ओढ्यावर हा बंधारा तयार करण्यात आला आहे..यासाठी 36 फूट लांब व 8 फूट रुंद व 7 फूट उंच बंधारा बांधून त्यामध्ये जमा केलेले प्लास्टिक कायमस्वरूपी टाकले जाते.सभोवताली 3 इंच सिमेंटची भिंत तयार तयार केली आहे .व त्यामधील मोकळ्या जागेत 3 स्तर करून प्लास्टिक टाकले जाते.
    या बंधाऱ्याचे उद्घाटन व पाण्याचे पूजन उद्योजक गिरीश चितळे,सुरेश कुंभार,जलसंधारण विभाग सांगली,वर्षाराणी पाटील,सरपंच सरपंच व मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी प्रकाश चव्हाण,गुरुप्रसाद रसाळ,ग्रामसेवक,रिया देशमुख,हजरत मुलाणी,महादेव भोसले ,शिवाजी देशमुख अरविंद शिंत्रे,धर्मा वाघ,पंढरीनाथ वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
    टाकावू प्लास्टिक पासून तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळाले पेटंट सचिन देशमुख यांनी ‘वेस्ट प्रॉडक्ट मशीन’ व ‘ प्लास्टिक डॅम तंत्रज्ञान’ याचा वापर करून प्लास्टिक पासून होणाऱ्या प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाय शोधला आहे. त्यांना बांधाऱ्या सह प्लास्टिक पासून तयार करण्यात आलेल्या विटा,ब्लॉक,मैलाचे दगड व अन्य उत्पादनांचे पेटंट मिळाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो.असा दावा देशमुख यांनी केला आहे.
    तीन वर्षे बंधाऱ्याचे टेस्टिंग
    २०१९ मध्ये या बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले होते.तेव्हापासून सलग तीन वर्षे याचे टेस्टिंग करण्यात आले.तीन वर्षात पडलेल्या पावसामुळे,विसापूर योजनेच्या पाण्यामुळे अनेकदा हा बंधारा भरला होता मात्र त्याला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाला नाही.आतील प्लास्टिक सह बंधाऱ्याची भिंत सुरक्षित आहे.