omicron test

दोन रुग्णांना ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.5 ची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. दोन रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुण्यात पाठवण्यात आले होते.

    गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वेगानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच महाराष्ट्रात (Maharashtra) ओमायक्रॉनचा (Omicron) सबव्हेरियंट बीए.5 (Sub Variant BA.5) ची लागण झाल्याले रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.

    महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं माहिती दिली आहे की, दोन रुग्णांना ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट बीए.5 ची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. दोन रुग्णांचे नमुने एनआयव्ही पुण्यात पाठवण्यात आले होते. असं सांगितलं जात आहे की, दोन्ही रुग्ण महाराष्ट्राच्या बाहेरील आहेत. सध्या व्यावसायिक कारणास्तव पुण्याच्या ग्रामीण भागांत वास्तव्यास आहेत.

    दुबईहून रुग्ण आल्याची माहिती

    आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, दुबईहून परतल्यानंतर पुणे विमानतळावर नियमित तपासणी दरम्यान या दोन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं समोर आलं होतं. आरोग्य विभागानं पुढे बोलताना म्हटलं की, सध्या, दोन्ही बाधित रुग्णांमध्ये, कोणत्याही प्रकारची लक्षणं दिसून आलेली नाहीत. त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर ते कोरोनामुक्त झाले आहेत.