गुंडेगाव यात्रेत रंगला कुस्त्यांचा आखाडा; पै. अनिल ब्राम्हणेंने पटकावली मानाची चांदीची गदा

गुंडेगाव (ता. नगर) येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त घेण्यात आलेला कुस्त्यांचा हगामा चितपट कुस्त्यांनी गाजला. शेवटची मानाची कुस्ती पै. अनिल ब्राम्हणे (ब्राम्हणी, ता. राहुरी) विरुध्द पै. अंगद बुलबुले (बारामती) यांच्यात झाला.

    अहमदनगर : गुंडेगाव (ता. नगर) येथील ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त घेण्यात आलेला कुस्त्यांचा हगामा चितपट कुस्त्यांनी गाजला. शेवटची मानाची कुस्ती पै. अनिल ब्राम्हणे (ब्राम्हणी, ता. राहुरी) विरुध्द पै. अंगद बुलबुले (बारामती) यांच्यात झाला. या कुस्तीत पोकळ घिस्सा डावावर पै. ब्राम्हणे याने पै. बुलबुले याला चितपट करुन भैरवनाथ केसरीचा मान मिळवून मानाची चांदीची गदा व २१ हजार रुपये रोख बक्षिस पटकाविले.

    यावेळी नगर तालुका तालिम सेवा संघाचे सचिव पै. बाळू भापकर, सोसायटीचे व्हाईस चेअरमन पोपट भापकर, पै. रतन भापकर, महाराष्ट्र केसरी अशोक शिर्के, त्रिदल सैनिक संघाचे सर्व पदाधिकारी, उपसरपंच संतोष भापकर, माजी सरपंच संजय कोतकर, माजी उपसरपंच सुनिल भापकर, नगर तालुका तालिम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, क्रीडा महासंघाचे राज्य अध्यक्ष राजेंद्र कोतकर, मेजर पै. झुंबर भापकर, पै. बापू चौधरी, पै. रामदास हराळ, पै. मिलिंद जपे, पै. गोरख शिर्के, अशोक घोडके आदी उपस्थित होते.

    डोळ्याचे पारणे फिटल

    कुस्त्यांच्या डावपेचांनी मल्लांनी उपस्थितांची वाहवाह मिळवली. एकशे एक रुपयापासून तर एकवीस हजार रुपया पर्यंन्त लावण्यात आलेल्या मल्लांच्या कुस्तीचा थरार रंगला होता. या निकाली कुस्त्यांनी ग्रामस्थांच्या डोळ्याचे पारणे फिटले. जिल्ह्यातील अनेक नामवंत मल्ल सहभागी झाले होते.