‘याकूबची कबर, मनसुख हिरेन हत्या, वसुली, भ्रष्टाचार’, आशिष शेलारांनी वाचली ठाकरे सरकारच्या पापांची यादीच..मोदींच्या दौऱ्यावर होत असलेल्या टीकेला जोरदार उत्तर

याकूबची कबर सजवणे, मनसुख हिरेनची हत्या, दाऊदच्या मालमत्तांची खरेदी, बदल्यांमध्ये वसुली, सचिन वाझे, नालेसफाईत भ्रष्टाचार, कोविडमध्ये नातेवाईकांची भलामण, मेट्रो कारशेड रखडवणे ही तुमच्या काळातली विकासकामं आहेत.

  मुंबई- आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendr Modi) मुंबईतील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यासाठी मुंबईत येत आहेत. दरम्यान, या कार्यक्रमाची मोठी जय्यत तयारी सुरु असताना, यावर विरोधकांकडून टिका होत आहे. तसेच ही सर्व कामे आमच्याच सरकारच्या काळात झाली आहेत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. तसेच आम्ही केलेल्या कामाचं श्रेयच हे सरकार घेतं आहे अशी आरोप देखील मविआने केला आहे. याला भाजपा आमदार आशिष शेलार यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. या सगळ्याला आशिष शेलार यांनी आता ट्विट करून उत्तर दिलं आहे. याकूबच्या कबर सजावटीपासून नालेसफाईतल्या भ्रष्टाचारापर्यंत सगळं श्रेय उद्धव ठाकरेंचंच आहे असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

  काय म्हटलंय ट्विटमध्ये?

  याकूबची कबर सजवणे, मनसुख हिरेनची हत्या, दाऊदच्या मालमत्तांची खरेदी, बदल्यांमध्ये वसुली, सचिन वाझे, नालेसफाईत भ्रष्टाचार, कोविडमध्ये नातेवाईकांची भलामण, मेट्रो कारशेड रखडवणे ही तुमच्या काळातली विकासकामं आहेत. या सगळ्याचं श्रेय हे निर्विवाद उद्धव ठाकरेंचंच आहे.

  ठाकरे तुमचा काय संबंध?

  आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन आणि लोकार्पण होतं आहे ही सगळी मुंबईकरांची स्वप्नपूर्ती आहे. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमचा काय संबंध? असलाच तर विरोध करण्याएवढाच. म्हणून आज मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदाच्या क्षणात विरजण घालताय. असं दुसरं ट्विटही आशिष शेलार यांनी केलं आहे. त्यामुळे आता नरेंद्र मोदींच्या दौऱ्याआधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरूद्ध भाजपा असा सामना सोशल मीडियावर रंगला आहे.

  विरजण का पाडता?

  पुढे आशिष शेलार म्हणतात, आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन आणि लोकार्पण होतं आहे ही सगळी मुंबईकरांची स्वप्नपूर्ती आहे. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमचा काय संबंध? असलाच तर विरोध करण्याएवढाच. म्हणून आज मुंबईकरांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदाच्या क्षणात विरजण घालताय. असं दुसरं ट्विटही आशिष शेलार यांनी केलं आहे.