After Ashok Chavan, Yashomati Thakur also contacted us; Big excitement after MLA Ravi Rana's claim
After Ashok Chavan, Yashomati Thakur also contacted us; Big excitement after MLA Ravi Rana's claim

अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ तीवसा मतदारसंघाच्या आमदार तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर ह्या सुद्धा भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा, आमदार रवी राणा यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

  MLA Ravi Rana’s claim : काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी काही आमदार राजीनामे (Ashok Chavan Resign)  देणार असल्याची चर्चा आहे. आता भाजप आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या वक्तव्यानंतर मोळी खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाणांच्या पाठोपाठ   तीवसा मतदारसंघाच्या आमदार तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर ह्या सुद्धा भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा, आमदार रवी राणा यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.
  आमदार रवी राणा म्हणाले,  अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे 10 ते 15 आमदार संपर्कात आहे.  मी या आधी पण सांगितलं होतं की, काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार आहे.  15 फेब्रुवारीला अमित शहा हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. तेव्हा तुम्हाला आणखी मोठे धक्के पाहायला मिळेल. उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये मोठे धक्के पाहायला मिळेल, राहिलेले पक्ष सुद्धा खाली होणार आहे.
  यशोमती ठाकूर भाजपच्या संपर्कात : आमदार रवी राणा
  यशोमती ठाकूर यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना रवी राणा म्हणाले,  तीवसा मतदारसंघाच्या आमदार तथा काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या सुद्धा भाजपच्या संपर्कात आहे. मात्र भाजपने त्यांना थांबायला सांगितलं आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघ सुद्धा खाली होणार आहे, असे देखील रवी राणा म्हणाले,
  अशोक चव्हाण यांचा पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा
  अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. 15 फेब्रुवारीला अमित शाहांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.  अशोक चव्हाण यांनी त्यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांना सोपवला आणि तो अध्यक्षांना स्वीकारलाही.  दरम्यान अशोक चव्हाणांनी त्यांचा राजीनामा काँग्रेस कार्यालयातही पाठवला आहे.  अशोक चव्हाणांच्या राजीनामा पत्रात पदापुढे माजी असा पेनानं उल्लेख केला आहे.
  काही आमदार भाजपात तर काही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
   काँग्रेसमध्ये भगदाड पडल्यानंतर काही आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपात जाणार आहेत. तर, काही  आमदार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपच्या उजव्या हिंदुत्ववादी भूमिकेला पर्याय म्हणून काँग्रेसचे काही आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.