भयावह परिस्थितीतून नंदुरबारचा यशवंत चौधरी युक्रेन येथून सुखरूप मायदेशी परतला

नंदुरबार (Nandurbar) येथील यशवंत चौधरी (Yashwant Chaudhary) हा विद्यार्थी युक्रेनच्या किवी या शहरात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेला होता पण तिथल्या भयावह स्थितीमुळे त्याला मायदेशी यावे लागले. नंदुरबार येथे स्वगृही पोहोचल्यानंतर यशवंत चौधरी याच्या परिवाराने त्याचे स्वागत केले तर सतत त्यांच्या संपर्कात राहून संपूर्ण माहिती देणारे नंदुरबार जिल्हा भाजपाचे अध्यक्ष विजय चौधरी यांनी देखील त्याचे स्वागत केले.

    नंदुरबार : रशियाने (Russia) युक्रेन (Ukraine) वर हल्ला (Attack) केल्यानंतर युक्रेनच्या भयावह परिस्थितीतून मायदेशी परतण्यासाठी भारतातील नागरिक व विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. भारत सरकारने (Govt Of India) चालवलेल्या ऑपरेशन गंगा (Operation Ganga) अंतर्गत युक्रेन मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्यात मोदी सरकारला यश आले आहे.

    नंदुरबार (Nandurbar) येथील यशवंत चौधरी (Yashwant Chaudhary) हा विद्यार्थी युक्रेनच्या किवी या शहरात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेला होता पण तिथल्या भयावह स्थितीमुळे त्याला मायदेशी यावे लागले. नंदुरबार येथे स्वगृही पोहोचल्यानंतर यशवंत चौधरी याच्या परिवाराने त्याचे स्वागत केले तर सतत त्यांच्या संपर्कात राहून संपूर्ण माहिती देणारे नंदुरबार जिल्हा भाजपाचे अध्यक्ष विजय चौधरी यांनी देखील त्याचे स्वागत केले.

    यशवंत चौधरी यांनी युक्रेनमधील परिस्थिती चा लेखाजोखा समोर मांडला. सुखरूप परत आलेल्या यशवंत चौधरी यांनी सांगितले की पहिला बाॅम्ब हल्ला झाल्या त्यावेळी आम्ही जवळपास ७०० विद्यार्थी होतो . त्यावेळी आम्ही ९/१० विद्यार्थी बनून लहान लहान गट तयार केले. आम्ही भारतीय दूतावासपर्यंत पोहचण्यासाठी ३ दिवस बिस्कीट व थोडे- थोडे पाणी पिऊन दिवस काढले. तेथील रेल्वे, बस कोणतेही वाहन आम्हाला सोडण्यासाठी तयार नव्हते म्हणून आम्ही कसेबसे स्थानिकांच्या मदतीने खाजगी वाहनातून भारतीय दूतावास गाठले.

    भारतीय दूतावासाच्या मदतीने कमी तापमानात कसेबसे आम्ही प्रवास करत हंगेरीची सीमा गाठली. बुकारेस्ट इथे पोहचल्यावर भारतीय नागरी उद्दयनं मंत्री यांनी आमची विचारपूस करून विमानात बसवले त्यानंतर आम्ही दिल्ली येथे आलो तेथे एक दिवस महाराष्ट्र सदनात राहिल्या नंतर आज स्वगृही परतलो. तिथली परिस्थिती अतिशय बिकट असून कधीही कुठल्याही क्षणी तिथे बॉम्बचा हल्ला होत होता परंतु आम्ही हिंमत न हारता आमच्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी मायदेशी करण्याचा निश्चय केला होता.

    युक्रेनच्या अनेक मोठ्या शहरांमध्ये फ्रान्सने अतोनात नुकसान केले असून वर्षानुवर्ष या शहरांना पूर्वपदावर येण्यासाठी वेळ लागणार आहे .आता पुढील शिक्षणसाठी आम्ही पुन्हा युक्रेनला न जाता दुसरीकडे शिक्षण घेणार आहोत. यावेळी यशवंत चौधरी यांनी खास करून नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन करून आभार मानले. सरकारने ज्या प्रकारे ऑपरेशन गंगा चालवले आहे त्यामुळेच आम्ही भारतात सुखरूप परतलो आहोत.