वर्धनगड येथील वर्धनी मातेची यात्रा दिनांक 22 रोजी 

वर्धनगड येथील वर्धनी मातेची यात्रा दिनांक 22 रोजी साजरी होत असून या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वर्धनीमाता पंच कमिटी अध्यक्ष राजाराम कारखानीस यांनी दिली आहे.

    वर्धनगड : वर्धनगड येथील वर्धनी मातेची यात्रा दिनांक 22 रोजी साजरी होत असून या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वर्धनीमाता पंच कमिटी अध्यक्ष राजाराम कारखानीस यांनी दिली आहे.
    वर्धनगड तालुका खटाव जिल्हा सातारा येथील वर्धनगड किल्ल्यावरील वर्धनी मातेची यात्रा दिनांक 22 रोजी भरत असून या यात्रेनिमित्त मुंबई, पुणे,कोल्हापूर,सोलापूर,बारामती तसेच राज्यातून हजारो भाविक या ठिकाणी देवीचा दर्शनाचा लाभ घेतात, अश्विन शुद्ध अष्टमीला दिनांक 22 रोजी वर्धनी मात्रेचा यात्रोस्तव दुपारी एक वाजता पालखीचे किल्ले वर्धनगड गावातून श्री वर्धनी मातेच्या मंदिराकडे प्रस्थान दुपारी 3:30वाजता वर्धनी मातेची आरती व पालखीची  गडावर प्रदक्षिणा, दिनांक 23 रोजी पहाटे ब्रह्म मुहूर्तावर होम हवन व सकाळी 8:00 वाजता आरती व घट उस्थापना दुपारी 4 वाजता गडावरील आरती व शिमो्लंघन व पालखीचे गावाकडे प्रस्थान करण्यात येणार आहे. 6:30 वाजता गावामध्ये आगमन 7:30 वाजता मानाई मंदिरासमोर शिमोलंगन घेण्यात येणार आहे. हो रात्री दहा वाजता गावातून पालखीची मिरवणूक घेण्यात येणार असल्याची माहिती राजाराम कारखानिस  व किशोर घोरपडे यांनी दिली आहे. या वर्धनी मातेच्या यात्रेनिमित्त गडावरती व गावामध्ये मिठाईची दुकाने खेळणी पाळणे येत असतात विविध जिल्ह्यातून येणारे हजारो भाविक देवीच्या दर्शनाचा लाभ घेतात रात्र करमणुकीचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.