येळी कोळसांगवी पूल बनला मृत्यूचा सापळा !

पाथर्डी तालुक्यातील येळी ते कोळसांगवी पुल मृत्यूचा सापळा बनला असून पाथर्डी व शेवगावला जोडणाऱ्या मध्यभागी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ऐन पावसाळ्यापूर्वी येळी व कोळसांगवी गावांचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

    पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील येळी ते कोळसांगवी पुल मृत्यूचा सापळा बनला असून पाथर्डी व शेवगावला जोडणाऱ्या मध्यभागी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ऐन पावसाळ्यापूर्वी येळी व कोळसांगवी गावांचा संपर्क तुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
    मागील वर्षी कोरडगाव महसूल मंडळात ऑगस्ट ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे येळी ते कोळसांगवी पूल पूर्णपणे नादुरुस्त होऊन पूर्णपणे उखडला गेला आहे. हे याबाबत सन २०२०-२१ वर्षी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील नादुरुस्त व खराब झालेल्या पुलांसाठी २०.५२ करोड निधी मंजूर झाला असून, अजूनही मुख्यमंत्री ग्राम सडक विभागाकडून कार्यारंभ आदेश संबंधित ठेका एजन्सीला देऊनसुद्धा काम सुरू न झाल्याने संतप्त व्यक्त होत आहे.
    महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला असताना सुद्धा मुख्यमंत्री ग्रामसडक विभागामार्फत येळी ते कोळसांगवी पुल निर्माणचे काम सुरू न झाल्याने येळी ते कोळसांगवी या दोन गावांचा पावसामुळे व पूल निर्मितीचे काम न झाल्याने संपर्क तुटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
    या गावात होणार पूल निर्मितीची कामे
    मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून पाथर्डी शेवगाव तालुक्यातील येळी ते कोळसांगवी ३० मीटर पुल निर्मितीसाठी २.६६ आणि देखभाल दुरुस्ती १.२३करोड,तीसगांव ते चिचोंडी ७० मीटर पुल निर्मितीसाठी ३ आणि देवा दुरुस्तीसाठी १.७८ करोड,भातकुडगाव ते साहजापुर ७० मीटर पुल निर्मितीसाठी ४.३९ आणि देखभाल दुरुस्तीसाठी ३.६३ करोड,मुंगी ते पिंगेवाडी ( प्रजीमा )६० मीटर पुल निर्मितीसाठी २.८१ आणि२.२२ करोड निधी मंजूर आहे.