
मागील चार ते पाच दिवसापासून राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आज काही ठिकाणी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई- सध्या राज्यातील काही जिल्ह्यात (State) पावसाने (Rain) हाहाकार माजवला आहे. जुलै महिन्यात राज्यातील कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, वसई-विरार, रायगड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, कोल्हापूर, सातारा, विदर्भातील काही जिल्हे, यवतमाळ, मराठवाडा येथे मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडेल असं हवामान विभागाकडून (Meteorological Department ) अंदाज वर्तविण्यात आला आहे. जुलै महिन्यातील पावसामुळं राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. मुंबईसह उपनगर ठाणे पालघर परिसरात जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तर दुसरीकडे मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. मागील चार ते पाच दिवसापासून राज्यात पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आज काही ठिकाणी आज यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कुठे यलो अलर्ट?
दरम्यान, आज राज्याच्या काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. कोकणातील रायगड जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाडून करण्यात आलं आहे.
गोसीखुर्द धरणाचे सर्वच 33 दरवाजे उघडले
सध्या राज्यात पावासाचा जोर कमी झाला असला तरी काही भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्यात गेल्या तीन ते चार दिवसापासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं नदी नाले दुथडी भरुन हात आहेत. नदी, नाले आणि धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. जोरदार पावसामुळं गोसीखुर्द धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ होत आहे. त्यामुळं गोसीखुर्द धरणाचे सर्वच्या सर्व 33 गेट उघडले आहेत. सध्या धरणातून 131320 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
अजूनही काही भागात पावसाची प्रतिक्षा…
राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असताना, दुसरीकडे अजूनही काही जिल्ह्यात पावसाची प्रतिक्षा आहे. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला नाही, त्याठिकाणी धरणांच्या, नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. काही भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.