योग आणि निसर्गोपचारामुळे वैद्यकीय पर्यटन क्षेत्रात भारत अग्रेसर राहील – रामदास आठवले 

नामक्कल जिल्ह्यात  कोल्ली हिल्स परिसर निसर्गोपचर आणि योग साठी अनुकूल असून हा परिसर वैद्यकीय पर्यटन क्षेत्र घोषित होऊ शकतो. यातून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो याबाबत अधिक  प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

    मुंबई : जगात वैद्यकीय पर्यटन (Medical tourism) क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. भारतात पारंपरिक निसर्गोपचार पद्धतीला शास्त्रोक्त पद्धतीने योग (Yoga) आणि निसर्ग (Natural) उपचाराची जोड देऊन  वैद्यकीय पर्यटन उभारले तर भविष्यात वैद्यकीय पर्यटन (Medical tourism) क्षेत्रात भारत अग्रेसर राहील असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी नामक्कल जिल्ह्यातील रासीपुराम येथे केले.

    दरम्यान,  नामक्कल जिल्ह्यात  कोल्ली हिल्स परिसर निसर्गोपचर आणि योग साठी अनुकूल असून हा परिसर वैद्यकीय पर्यटन क्षेत्र घोषित होऊ शकतो. यातून स्थानिकांना रोजगार मिळू शकतो याबाबत अधिक  प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले. वैद्यकीय पर्यटनाचे महत्व या बाबत आयोजित परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी आयोजक नाचरोपथी योगा क्लिनिकचे अध्यक्ष  डॉ. विजय कुमार, डॉ सौंदर्या पंडियन, आयुष मंत्रालयाचे तामिळनाडू राज्याचे  सहसंचालक डॉ एस मानवलन, डॉ मोनिका प्रकाश, डॉ प्रसन्ना, डॉ.बसवराज डोनार, नेहरू युवा केंद्राचे अधिकारी सरन गोपाल, कुमारी मोहना आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजकांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार केला. यावेळी विद्यार्थ्यांशीही रामदास आठवले यांचा संवाद झाला. या कर्यक्रमास रिपाइंचे तामिळनाडू प्रदेश अध्यक्ष फादर मायकल अंटोनी सुसाई, हर्षित जैन आदी मान्यवर उपस्थित होते.