योगगुरु रामदेव बाबांनी महिलांबद्दल केलं ‘हे वादग्रस्त’ वक्तव्य, बाबा म्हणाले…

ठाण्यातील एका योगा कार्यक्रमामध्ये रामदेव बाबांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी व्यासपीठावर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे, (Shrikant Shinde) तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) उपस्थित होत्या. दरम्यान, यावेळी महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते, पण महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा म्हणाले की...

    ठाणे : नुकतेच भिडे गुरुजींनी महिलांच्या टिकलीवरुन केलेले वादग्रस्त वक्तव्य ताजे असताना, आता योगगुरु रामदेव बाबांनी महिलांबद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलं आहे, त्यामुळं रामदेव बाबांवर (Ramdev Baba) चार बाजुनी टिका होत आहे. महिला साडीमध्ये चांगल्या दिसतात, तर सलवार सूटमध्ये देखील चांगल्या दिसतात, पण माझ्या नजरेने पाहिलं, तर काही नाही घातलं तरी महिला चांगल्या दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरु रामदेव बाबा यांनी केलं आहे, त्यामुळं बाबांना रोषांना सामोरी जावे लागत असून, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    दरम्यान, ठाण्यातील एका योगा कार्यक्रमामध्ये रामदेव बाबांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी व्यासपीठावर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे, (Shrikant Shinde) तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) उपस्थित होत्या. दरम्यान, यावेळी महिलांनी योगासाठी ड्रेस आणले होते, पण महिलांना साड्या नेसायला वेळच मिळाला नाही. यावर बाबा म्हणाले की, साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, पण महिला साड्यांवर चांगल्या दिसतात. महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी महिला चांगल्या दिसतात, असं बाबांनी म्हटल्यावर वाद निर्माण झाला आहे.