Yoga is the best way to increase strength - MP Ramdas Tadas states

आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. २१ जून हा दिवस जगातल्या अनेक भागात सर्वात मोठा दिवस असतो आणि एक प्रकारे सूर्याशी जवळीक साधणारा हा दिवस असतो. या गोष्टी लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी २१ जून ही तारीख निश्चित करण्यात आली.

    वर्धा : नियमित योगासनांचा अभ्यास केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती तसेच आँक्सीजन लेवल वाढते, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी योग हा सर्वात्तम मार्ग असल्याचे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी आंतराष्ट्रीय योग दिवसानिमित्त केले.

    कोविड-१९ या जागतिक महामारीमुळे अनेक नागरिकांना प्राण गमवावे लागले, याचे महत्वाचे कारण म्हणजे शरीरामध्ये असलेली रोगप्रतिकार शक्ती. कोरोनापासून बचाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपल्याला गंभीर आजार स्पर्श देखील करू शकणार नाहीत. रोगप्रतिकारक शक्ती बळकट असल्यास आपले शरीर आजारांविरोधात लढण्यास सक्षम असते. गंभीर आजारांचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती आपल्या शरीराला सुरक्षा कवच प्रदान करण्याचे कार्य करते. परंतु, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर सर्दी-खोकल्यासारख्या आजारावर मात करणे कठीण होते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी केवळ आहारच नाही तर शारीरिक कसरती देखील होणे गरजेचे आहे. यासाठी दैनंदिन जीवनात योगासने, प्राणायम करण्यासाठी वेळ काढणे आवश्यक आहे.

    आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. २१ जून हा दिवस जगातल्या अनेक भागात सर्वात मोठा दिवस असतो आणि एक प्रकारे सूर्याशी जवळीक साधणारा हा दिवस असतो. या गोष्टी लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी २१ जून ही तारीख निश्चित करण्यात आली. २१ जूनला “आंतरराष्ट्रीय योग दिवस” निमित्य देशासह जिल्ह्यातही विविध सेवाभावी संस्थांतर्फे योगासन शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. निरोगी आरोग्याकरिता योगासन अतिशय महत्वाचे असून वर्धा लोकसभा क्षेत्रातील सेवाभावी संस्था, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, कार्यकर्ते, नागरिकांनी त्या-त्या क्षेत्रात आयोजित योग, प्राणायाम शिबीरात सहभागी होण्याचे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.

    @MP Ramdas Tadas_officeRT