“तुम्ही बसा माझ्या खुर्चीवर अन् घ्या निर्णय…” ; का संतापले झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी

'तुम्ही बसा माझ्या खुर्चीवर, मी येतो तुमच्या ठिकाणी आणि घ्या निर्णय' अशा शब्दांत झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांनी संताप व्यक्त केला. यानंतर मात्र झेडपीत काय घडलं ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

  सोलापूर : ‘तुम्ही बसा माझ्या खुर्चीवर, मी येतो तुमच्या ठिकाणी आणि घ्या निर्णय’ अशा शब्दांत झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांनी संताप व्यक्त केला. यानंतर मात्र झेडपीत काय घडलं ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

  जिल्हा परिषदेत सोमवारी बऱ्याच घडामोडी घडल्या. प्रशासकीय कामकाजाचा दिवस असल्याने अधिकारी भेटतात म्हणून अनेक ग्रामस्थ आपल्या गावातील तक्रारी घेऊन जिल्हा परिषदेत आले होते. त्यात मोहोळ तालुक्यातील कोळेगाव ग्रामपंचायतचे काही सदस्य, ग्रामस्थ आपल्या उपसरपंचही जिल्हा परिषदेमध्ये डेरेदाखल झाले . या सर्वांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या दालनात धाव घेतली. याआधी मोहोळ तालुक्यातीलच वाफळे येथील एका तरुणाने अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. तोही थेट स्वामी यांच्या दालनात आला होता. त्यामुळे स्वामी यांचा गोंधळ उडाला होता. अशातच कोळेगावच्या माजी सरपंच पुतळाबाई शिंदे यांनी प्रशासकीय बदलीने आलेल्या महिला ग्रामसेवकाला गावात काम करू दिले जात नाही, हे तीन महिने झाले सुरू आहे. सरपंच यांना याबाबत सूचना करावी, अशी मागणी केली. ईतर उपस्थितांनी ही कैफियत उचलून धरली.

  त्यामुळे सीईओ स्वामी यांनी थेट ग्रामसेवकाची बदली करून दुसरा ग्रामसेवक देण्याचे आदेश ग्रामपंचायत विभागाला दिले. यावर कोळेगाव ग्रामस्थांचे समाधान झाले नाही. ग्रामस्थ मात्र त्याच ग्रामसेवकावर अडून बसले. तेव्हा चिडलेल्या स्वामीं यांनी “तुम्ही बसा माझ्या खुर्चीवर, मी येतो तुमच्या ठिकाणी आणि घ्या निर्णय’ या भाषेत सर्वांना सुनावले. त्यामुळे ग्रामस्थांचा नाईलाज झाला. मागणीचे निवेदन त्यांनी सीईओ स्वामी यांनी दिले व सर्वजण दालनाबाहेर आले.

  तर आंदोलन करू….

  उपसरपंच माधव देशमुख यांनी घडला प्रकार कथन केला . सरपंचाचे पती भाऊराव शिंदे हे जाणीवपूर्वक ग्रामसेवकाला काम करू देत नाहीत, जुना वाद उकरून काढत आहेत. जर जिल्हा परिषद प्रशासनाने दुसरा ग्रामसेवक दिला तर आम्हाला मान्य नाही, आम्ही आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.

  सोमवारी जे सदस्य जिल्हा परिषदेमध्ये आले होते त्यांच्याच पॅनल मधून सरपंच पुतळाबाई शिंदे या निवडून आल्या होत्या, परंतु नंतर त्या आमच्या पॅनल मधून फुटून विरोधकांना जाऊन मिळाल्या आहेत, जसे सत्तेतून एकनाथ शिंदे फुटले तसेच आमचे सरपंच पती भानुदास शिंदे फुटले आहेत अशी चर्चा ग्रामस्थ करीत होते.