…डुकरांची मत घेऊन तुम्ही निवडून आलात; गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

शिंदे-फडणवीस सरकारने आज विधीमंडळ सभागृहात बहुमत सिद्ध केले आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारने पहिला विजय मिळवला. त्यानंतर आज त्यांची कसोटी लागणार होती. सकाळी ११ वाजता विधिमंडळाचे कामकाज सुरु झाले. यावेळी शिंदे गटाने बहुमत जिंकले. दरम्यान यानंतर गुलाबराव पाटील यांचं भाषण झालं. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.

    मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने आज विधीमंडळ सभागृहात बहुमत सिद्ध केले आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून सरकारने पहिला विजय मिळवला. त्यानंतर आज त्यांची कसोटी लागणार होती. सकाळी ११ वाजता विधिमंडळाचे कामकाज सुरु झाले. यावेळी शिंदे गटाने बहुमत जिंकले. दरम्यान यानंतर गुलाबराव पाटील यांचं भाषण झालं. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला.

    दरम्यान यावेळी गुलाबराव पाटील सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला. चार लोकांच्या कंडोळ्यानं उद्धव साहेबांना बावळट केलं, चार मतं घ्यायची लायकी नाही याची आणि आम्हाला डुक्कर बोलतात. डुकरांची मत घेऊन तुम्ही निवडून आलात. हे कोण सहन करणार आहे. आम्हाला मंत्री केलं हे उपकार आहेत, असं देखील ते म्हणाले.

    तसेच पुढे बोलतांना त्यांनी भास्कर जाधवांना देखील सल्ला दिला. भास्कर जाधव यांनी चिंता कऱण्याची गरज नाही. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवणार आहोत. आम्हाला गटारीचं पाणी, प्रेतं अशा धमक्या देण्यात आल्या. आम्ही काही लेचेपेचे नाही. हातात जोर असणारा माणूस येतो आणि सत्तेत सामील होतो असा, इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला. शिवसेना संपत असेल तर ती वाचवण्याची जबाबदारी आमची आहे, असंही ते म्हणाले.