chhatrapati sambhajinagar crime

सिद्धार्थ उद्यानामध्ये एका तरुणाने चक्क तिच्या आई समोरच विद्यार्थिनीला मोबाईल नंबर मागत गोंधळ घातला आहे.

    छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरातील सिद्धार्थ उद्यानामध्ये दररोज गर्दी असते. यामुळे याठिकाणी सुरक्षा रक्षकदेखील तैनात करण्यात आले आहेत. सिद्धार्थ उद्यानामध्ये एका तरुणाने चक्क तिच्या आई समोरच विद्यार्थिनीला मोबाईल नंबर मागत गोंधळ घातला आहे.

    तरुणाने मोबाईल नंबर मागितल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी याबाबतीत आरडाओरडा केला. त्यानंतर उद्यानाच्या सुरक्षारक्षकांनी दामिनी पथकाला फोन करून बोलावलं. दामिनी पथकाने (Damini Squad) उद्यानात हजर होत मुलाला ताब्यात घेऊन क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये पाठवलं. पोलिसांनी मुलाच्या नातेवाईकांसमोर समज देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती दामिनी पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक फसाटे यांनी दिली आहे.