बेकायदा तलवार बाळगणाऱ्या तरुणाला बारामतीत अटक

शहरातील जामदार रोड परिसरात हातामध्ये बेकायदा तलवार बाळगणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. प्रकाश मारुती चांदगुडे (वय ३४, रा. कसबा, बारामती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शहरातील जामदार रोड परिसरात हातामध्ये बेकायदा तलवार बाळगणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. प्रकाश मारुती चांदगुडे (वय ३४, रा. कसबा, बारामती) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

    पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी रात्री तपास पथक पोलिस कॉन्स्टेबल तुषार चव्हाण, पोलीस नाईक दशरथ कोळेकर, पोलीस नाईक खांडेकर, पोलीस शिपाई इंगोले व कोठे हे रात्री गस्त करत असताना जामदार रोड मुक्ती टाउन शेजारी प्रकाश मारुती चांदगुडे हा त्याच्या हातामध्ये कपड्यामध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत तलवार घेऊन फिरत असताना सापडला. त्याला या पथकाने तात्काळ अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्यात आली.

    या इसमाच्या घरामध्ये पत्नीसोबत वाद चालू आहेत. पोलिसांनी त्याला अटक करून पुढील गंभीर गुन्हा होण्यापासून वाचवले आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या आदेशान्वये पोलीस नाईक देवा खाडे हे करत आहेत.