
पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास लुटमार करण्याच्या उद्देशाने टोळक्याने या वृद्धाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे
नाशिक : गेल्या 24 तासात दोन हत्या तर दोन संशयित आत्महत्यांनी नाशिक शहर हादरून गेल आहे. नाशिक मध्ये काल रात्रीच्या सुमारास पुन्हा एकाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. हरीश पाटील (वय ५०) असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. नाशिक शहरातील पुणे रोडवर असलेल्या पौर्णिमा बस स्टॉप परिसरात ही घटना घडली.
गेल्या 24 तासात नाशिक मध्ये 2 हत्या करण्यात तर 2 संशयित आत्महत्या झाल्या आहेत. गुरुवारी एका मोरे नामक युवकावर जुन्या वादातून म्हसरूळ मध्ये वार करून हत्या करण्यात आली, तर तर बाप लेकाचा संशयित मृतदेह घरात आढळून आला. गुरुवारी पुन्हा नाशिक शहरामध्ये एका इसमाची हत्या करण्यात आली. नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारीने प्रचंड डोकं वर काढलेले पहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पहाटे 4 ते 5 वाजेच्या सुमारास लुटमार करण्याच्या उद्देशाने टोळक्याने या वृद्धाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे . याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.