मंगळवार पेठ परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मंगळवार पेठ येथे राहणाऱ्या एका तरुणाने रात्री घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. समर्थ मंदिर चौक परिसरातील बालाजीनगर व सातवीच्या पिछाडीला असणाऱ्या झोपडपट्टीत ही घटना घडली. 

    सातारा मंगळवार पेठ येथे राहणाऱ्या एका तरुणाने रात्री घरातच साडीने गळफास घेऊन आत्महत्या (Youth Suicide in Satara) केल्याची घटना घडली. समर्थ मंदिर चौक परिसरातील बालाजीनगर व सातवीच्या पिछाडीला असणाऱ्या झोपडपट्टीत ही घटना घडली.

    रवी प्रकाश पवार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. मात्र, रवी हा मजुरीची छोटीमोठी कामे करत होता. नेहमीप्रमाणे तो रात्री येऊन जेवण करून झोपी गेला.

    मध्यरात्री कॉटवरच साडीचा गळफास तयार करून त्याने आपली जीवनयात्रा संपली. सकाळी त्याच्या पत्नीच्या हा प्रकार निदर्शनास आला. दरम्यान, या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली असून, या प्रकरणाचा अधिक पोलिसांकडून करण्यात येत आहे.