मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची आत्महत्या; झाडाला गळफास घेऊन संपवलं जीवन

तालुक्यातील वारेगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केली. या तरूणाने लिंबाच्या झाडाला दोरी लावून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी समोर आली.

    फुलंब्री : तालुक्यातील वारेगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केली. या तरूणाने लिंबाच्या झाडाला दोरी लावून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी समोर आली. ‘मी मराठा आरक्षणासाठी आहुती देत आहे, माझा जरांगे पाटील यांना पाठिंबा’, अशा आशयाचा मजकूर असलेली चिठ्ठी त्याच्याजवळ आढळून आली.

    ज्ञानेश्वर शिवाजी मोहारे (२४, रा. वारेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. ज्ञानेश्वर याने सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास वारेगाव शिवारातील गट नंबर १७१ मधील लिंबाच्या झाडाला दोरी लावून गळफास घेत आत्महत्या केली.

    दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे, जमादार संतोष डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. मृतदेह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आला.