
नाशिकमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रम सुरू झाल्यानतंर गौतमीचा डान्स दिसत नसल्यामुळे काही उपद्रवी तरुणांनी एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
नाशिक : नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil)आणि राडा हे आता समीकरणच झालं आहे. तिच्या कार्यक्रमात गोंधळ होत असल्याच्या बातम्या इतक्यात समोर येताना दिसत आहे. दोन-तीन दिवसापुर्वाी बार्शीतील कार्यक्रमावरुन आधीच राडा झाला. गौतमी पाटील हिच्याविरोधात बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण निवळलं नसताना आता नाशिकमधुन एक बातमी समोर येत आहे. गौतमीच्या नाशिकमधल्या कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी केली आहे. एव्हढेच नव्हे तर या कार्यक्रमात पत्रकारांना मारहाणही झाल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. मात्र, गौतमी पाटील हिचा नाशिकमध्ये डान्सचा कार्यक्रम होता, पण या कार्यक्रमाला नाशिककरांनी पाठ फिरवल्याचं चित्र दिसत होतं. मात्र,]तसेच, यावेळी पत्रकारांनाही खुर्च्यांनी मारहाण केली, यामध्ये मीडियाच्या अनेक कॅमेरांचंही नुकसान झालं आहे. या घटनेवरुन आता नाशित पोलिसांवरही ताशेरे ओढले जात आहे. नाशिक शहरामध्ये पहिल्यांदाच गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला. मात्र, ही घटना घडली तेव्हा पोलीस कार्यक्रम पाहण्यात दंग होते असं बोललं जात आहे.
बार्शीमध्ये तक्रार दाखल
सोलापुरात गौतमी पाटील तिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमी पाटील हिच्याविरोधात बार्शी पोलीस ठाण्यात (Barshi Police Station) तक्रार दाखल करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेची सध्या खूप चर्चा सुरु आहे. गौतमी पाटील आणि तिचा सहकारी केतन मारणे यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. बार्शीतील कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र गायकवाड (Rajendra Gaikwad) यांनी बार्शी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे. गौतमी पाटीलने माझी फसवणूक करून मला मानसिक त्रास दिला. त्यामुळे मी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे.
नियमांचा भंग केल्याने आयोजकांवरही गुन्हा
पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी दिलेली नसताना गौतमी पाटीलचा लावणी कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल केला आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बार्शीत 12 मे रोजी गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आयोजक गायकवाड यांनी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. कायदा आणि सुव्यवस्था, संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी काही कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत पोलिसांनी गायकवाड यांना लेखी सांगितलं होतं. मात्र कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता त्यांनी थेट कार्यक्रम घेण्यात आला. त्यामुळे नियमांचा भंग केल्याने त्यांच्या विरोधात बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. भादवि कलम 188, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 135, 37(3) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.