संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी तरुणाची हत्या (Youth Murder) केल्याची घटना भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे घडली. दिनेश पुसू गावडे (रा. लाहेरी ता. भामरागड) असे मृत तरुणाचे नाव असून, तो विवाहित होता.

    गडचिरोली : पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी तरुणाची हत्या (Youth Murder) केल्याची घटना भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे घडली. दिनेश पुसू गावडे (रा. लाहेरी ता. भामरागड) असे मृत तरुणाचे नाव असून, तो विवाहित होता.

    पेनगुंडा येथे आयोजित क्रीडा स्पर्धेसाठी दिनेश गेला होता. रात्रीच्या सुमारास बंदूकधारी नक्षल्यांनी गावात प्रवेश करून दिनेशला आपल्यासोबत घेऊन गावाबाहेर गेले. तेथे त्याची तीक्ष्ण हत्याराने हत्या केली. हत्येनंतर नक्षल्यांनी दिनेशनच्या मृतदेहाजवळ पत्रक टाकले. त्यामध्ये दिनेश हा पोलिस खबऱ्या असल्याचा आरोप नक्षल्यांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, या भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.

    मुख्यमंत्र्यांचा दौरा आटोपताच हत्याकांड

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त पिपली बुर्गी ठाण्यात पोलिस जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात जिल्ह्यातून नक्षलवाद हद्दपार झाल्याचे म्हटले होते; परंतु त्याच दिवशी रात्री नक्षल्यांनी तरुणाची हत्या केली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.