खिशातून पैसे काढल्याच्या रागातून तरुणाचा खून, खराडी मधील घटना; सराईत गुन्हेगाराला अटक

खिशातून ५०० रुपये काढल्याच्या रागातून एका तरुणाला बेदम मारहाण करुन खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार खराडी येथील म्हसोबा मंदिराजवळ घडला आहे.

    पुणे : खिशातून ५०० रुपये काढल्याच्या रागातून एका तरुणाला बेदम मारहाण करुन खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार खराडी येथील म्हसोबा मंदिराजवळ घडला आहे.

    किरण अशोक साठे (वय २४ रा. खराडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लोकेश रविंद्र पाटील (वय २२ रा. पाटील वस्ती, केसनंद) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक गोरक्ष मच्छिंद्र घोडके यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ससून हॉस्पिटलमधील शवविच्छेदन अहवालात खून असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. लोकेश हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. किरण साठेने आरोपी लोकेश पाटील याच्या खिशातून गुपचूप ५०० रुपये काढून घेतले. या कारणावरुन लोकेशने लाकडी बांबूने किरणच्या डोक्यात, हातावर व नाकावर मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी होऊन किरणचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालातून किरण साठे याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर करीत आहेत.