Attempted murder by attacking own father with a sharp weapon with the help of a friend

- जुगार खेळण्यासाठी घेतलेले पैसे परत न दिल्याने खून केल्याची माहिती, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; दोघांना अटक

    पुणे :  पुण्यात जुगाराच्या पैशांवरून तरुणाचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, जुगार खेळण्यासाठी घेतलेले २८ लाख रुपये परत न केल्याने तरुणाचे अपहरणकरुन त्याचा खून केला गेला आहे. एका सराइत गुन्हेगारासह दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

    निखिल उर्फ संकेत चंद्रशेखर अनभुले (वय ३२, रा. आईसाहेब बिल्डींग, आंबेगाव खुर्द) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लहू माने (वय ४०), विशाल अमराळे (वय ३५) यांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल याची पत्नी हर्षदा (वय २४) हिने याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी अमराळे, माने अनभुलेच्या ओळखीचे आहे. आरोपींकडून अनभुले क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळण्यासाठी २८ लाख रुपये घेतले होते. अनभुले याने पैसे परत न केल्याने आरोपी चिडले होते.

    सराइत गुन्हेगार माने याने त्याला धमकावण्यास सुरूवात केली. अनभुले याचे बिबवेवाडी भागातून अपहरण करुन त्याला डांबून ठेवले. त्याच्यावर शस्त्राने वार करुन खून केला. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. माने आणि अमराळे यांना अटक करण्यात आली.