संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील मंगरुळ फाट्यालगत सकल मराठा समाजाच्या (Maratha Community) तरुण बांधवांनी मराठा आरक्षणासाठी तसेच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी झाडाला उलटे लटकून आंदोलन केले.

    छत्रपती संभाजीनगर : जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील मंगरुळ फाट्यालगत सकल मराठा समाजाच्या (Maratha Community) तरुण बांधवांनी मराठा आरक्षणासाठी तसेच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी झाडाला उलटे लटकून आंदोलन केले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करत झाडाला उलटे लटकून घेतले.

    आंदोलकांच्या वतीने शासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे. अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांवर दाखल खोटे गुन्हे तात्काळ रद्द करावे. यावेळी राज्य सरकारला मराठा आरक्षण तात्काळ लागू करा. अन्यथा आम्ही आज झाडाला लटकलो, उद्या सरकारला लटकवू.

    तसेच मराठा समाजासाठी मागील बारा दिवसांपासून उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांच्या जीवाला काही धोका झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल. अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.