दूध दरासाठी युवा सेनेने अडविली वाहतूक ; दुग्ध मंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही

सोलापूर जिल्हा युवा सेनेच्यावतीने दूध दरवाढीसाठी बाभुळगाव येथे रस्त्यावर दूध ओतून निषेध सरकारचा निषेध करण्यात आला. गायीच्या दुधाला ४० रुपये, तर म्हशीच्या दुधाला ७५ रुपये दर न दिल्यास दुग्ध मंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही, असा युवा सेनेने दिला आहे.

  अकलुज :  सोलापूर जिल्हा युवा सेनेच्यावतीने दूध दरवाढीसाठी बाभुळगाव येथे रस्त्यावर दूध ओतून निषेध सरकारचा निषेध करण्यात आला. गायीच्या दुधाला ४० रुपये, तर म्हशीच्या दुधाला ७५ रुपये दर न दिल्यास दुग्ध मंत्र्यांना सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही, असा युवा सेनेने दिला आहे.

  जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख सोनू  पराडे पाटील व बाभुळगावचे सरपंच भूषण भैय्या पराडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

  महाराष्ट्रातील दुष्काळ जन्य परिस्थिती पहाता शेतकऱ्यांना शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणे जिकिरीचे झाले आहे. त्यातच पशुपालन व्यवसाय अडचणीत आला आहे. सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती आणि दुध उत्पादनांवर होणार खर्च, प्रती लिटर दुधाला मिळणारा दर याचे गणित जुळविताना शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. दुध खरेदी बाबत शासनाचे कोणतेही धोरण नसल्याने खासगी दुध खरेदी करणाऱ्या संस्था शेतकऱ्यांना लूटत आहेत. अशा संस्थांवर शासनाचे कोनतेही नियंत्रण नाही. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख महादेव बंडगर, युवा सेना उपतालुका प्रमुख दुर्वा आडके, चंद्रकांत पराडे, बबलु पाटील, अविनाश पराडे, सागर साळुंखे, अशोक पराडे, सुनील पराडे, संग्राम पराडे, गणेश गोडसे, संतोष पराडे, गणेश पराडे, अक्षय पराडे, धनाजी सुरवसे, गणेश चव्हाण, आबा साठे, दादासो गोडसे, समाधान पराडे, सिताराम पराडे, राजाभाऊ पराडे, दयानद इंगळे, गणेश काळे, लालासाहेब भोई, प्रतिक इंगळे, प्रथमेश भोई, आबा कुंभार आदी शेतकरी युवा सैनिक उपस्थित होते.

  खरेदीदारच खात आहेत मलिदा
  दुष्काळजन्य परिस्थितीत जनावरांनच्या चाऱ्याची कमतरता, पशुखाद्यचे गगनाला भिडलेले दर पाहता दुध उत्पादन खर्च वाढला असल्याने गायीचे दूध ४० रुपये तर म्हशीचे दूध ७५ रुपये प्रतिलीटर असा दर द्यावा. सरकारचने व दुध दराबाबत ठोस निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांना लाभापासून वंचित रहावे लागत आहे. खरा मलिदा मात्र दुध खरेदीदारच खात आहेत, असा आराेप अांदाेलकांनी केला.

  प्रत्येक जिल्ह्यात दूध संघ दर वेगवेगळा देत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ३३ रुपये सातारा पुणे जिल्ह्यात ३१ रुपये तर सोलापूर जिल्ह्यात २६ रुपये शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळत आहे. गाईच्या दुधाला ४० रुपये व म्हशीच्या दुधाला ७५ रुपये दर द्यावा अन्यथा दुग्ध मंत्राला सोलापूर जिल्ह्यात पाऊल ठेवू देणार नाही.

  -गणेश इंगळे, जिल्हा प्रमुख, युवा सेना