युवा उर्जा २०२४ मंदार महोत्सवला शानदान सुरवात

    चिपळूण : तालुक्यातील पेढांबे येथील मंदार एज्युकेशन सोसायटी या विद्यानगरीत युवा उर्जा २०२४ मंदार महोत्सवला शानदार सुरवात झाली. मंदार महोत्सव म्हणजे मंदार विद्यानगरीतील विद्यार्थ्यांना नवचैतन्य देणारा, स्फुर्ती देणारा, त्यांच्या कलागुणांना वाव देणारा एक उत्सव. मंदार एज्युकेशन सोसायटी, पेढांबे ही संस्था गेली ४१ वर्ष मंदार महोत्सवाचे आयोजन करते आहे. दि. ३० जानेवारी २०२४ पासून ” युवा उर्जा २०२४ मंदार महोत्सवाच्या वार्षिक क्रिडा महोत्सवाला सुरवात झाली आहे. अलोरे शिरगांवचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉनच्या उदघाटनाने क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ झाला.

    यादरम्यान संस्थेच्या व्हा. चेअरमन श्रीमती शैलजा शिंदे, तसेच सर्व विभागाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संखेने उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन मंदार शिंदे, सचिव व मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विलास सावंत आणि संस्थेच्या विश्वस्त व बी. एड. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वेदांती सावंत यांनी या महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो, व्हॉली बॉल, बॅटमिंटन, कॅरम, चेस, रस्सी खेच, ऍथलेटिक आदी खेळांचा समावेश आहे.

    “युवा उर्जा २०२४ मंदार महोत्सव” मध्ये ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२४ दरम्यान विविध क्रीडा स्पर्धा तर ८ ते १० फेब्रुवारी दरम्यान भव्य सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण आणि स्नेहभोजनाने महोत्सवाची सांगता होईल. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.