काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सहभागी

या यात्रेच्या निमित्ताने देशातील दोन तरुण नेतृत्व एकत्र आले आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा पाचवा दिवस आहे. सुरुवातील आदित्य ठाकरे हे नांदेमध्ये दाखल झाले होते, त्यानंतर ते हिंगोलीत पोहचले आहेत. आदित्य ठाकरे हे यात्रेबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधीसोबत ते हिंगोलीला जाणार आहेत. तसेच यात्रेत देखील सहभागी होऊन लोकांबरोबर, राहुल गांधीसोबत चालणार आहेत.

    हिंगोली – सध्या काँग्रेसची भारत जोडो (Bharat jodo Yatra) यात्रा नांदेडमध्ये आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळत आहे, दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेस नेते या यात्रेत सहभागी झाले होते. आज कन्हैयाकुमार यांनी नांदेड येथे हजेरी लावली आहे. यावेळी कन्हैयाकुमार यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर बोचरी टिका केली. देशात महागाई, बेरोजगारीची समस्या मोठी असताना, केंद्रातील भाजपा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. जनतेला त्यांनी वाऱ्यावर सोडून दिले आहे. अशा विपरीत परिस्थितीत भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देश जोडण्यास निघालेल्या राहुल गांधी यांच्याकडून लोकांच्या आशा, अपेक्षा व विश्वास असल्याने प्रचंड मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत, असे काँग्रेस नेते कन्हैयाकुमार (Kanhaiya umar) यांनी म्हटले. दरम्यान, आज या यात्रेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सहभागी झाले आहेत. दरम्यान, या यात्रेत बालविवाह रोखण्यासाठी “लेक लाडकी”चा सामाजिक संदेश देणारी सतरा वर्षाची युवती सारिका पाखरे (मानूर, जिल्हा बीड) ही देखील पदयात्रेत सहभागी झाल्याने ती लक्षवेधी ठरली.

    दरम्यान, या यात्रेच्या निमित्ताने देशातील दोन तरुण नेतृत्व एकत्र आले आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आजचा पाचवा दिवस आहे. सुरुवातील आदित्य ठाकरे हे नांदेमध्ये दाखल झाले होते, त्यानंतर ते हिंगोलीत पोहचले आहेत. आदित्य ठाकरे हे यात्रेबरोबर काँग्रेस नेते राहुल गांधीसोबत ते हिंगोलीला जाणार आहेत. तसेच यात्रेत देखील सहभागी होऊन लोकांबरोबर, राहुल गांधीसोबत चालणार आहेत. सकाळी राहुल गांधी यांचे स्वागतासाठी दोन क्विंटल फुलांचा सडा कित्येक फूट शिंपून सेनी (ता. अर्दापूर) येथे ग्रामस्थांनी जमा केले. नांदेड जिल्ह्यातील अभूतपूर्व गर्दी, लोकांचा उत्साह आणि सहभागानंतर सायंकाळी यात्रेने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला.