मोठी बातमी! मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन झिशान सिद्दीकींची हटवण्यात आलं

युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी संघटनेत फेरबदल केले आहेत. झिशान यांच्याकडून मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्षपदावरन हटवण्यात आलं आहे.

    मुंबई: काँग्रेसपक्षामधून एक मोठी बातमी समोर येत आहे.  काँग्रेसचे माजी नेते आणि नुकतंच अजित पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेलेले बाब सिद्दिीकी (Baba Siddiqu) यांचा मुलगा झिशान सिद्दिकी (Zishaan Sidhhique) याला मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. काँग्रेस (Congress) पक्षाकडून मंगळवारी रात्री उशीरा याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले. झिशान सिद्दिकींच्या जागी आता अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना अध्यक्षपदी निवडण्यात आलं हे. तर सुफियान मोहसीन हैदर यांच्याकडे मुंबई युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी संघटनेत फेरबदल केले आहेत. देशातील विविध राज्यांमधील पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. दिल्ली, गोवा, अंदमान निकोबार, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा आणि मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.

    काही दिवसांपूर्वीच झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तेव्हापासून झिशान हेदेखील काँग्रेस सोडतील, अशी चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी काँग्रेसच्या बैठकांनाही उपस्थिती लावली नव्हती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून झिशान यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता झिशान सिद्दीकी कधीपर्यंत काँग्रेसमध्ये थांबतात, हे पाहावे लागेल.