जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी

जिल्हा परिषद सदस्या, राष्ट्रवादी पक्षाच्या महिला सदस्या, आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय समिती सदस्या सुनीता भांगरे याना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    अकोले : जिल्हा परिषद सदस्या, राष्ट्रवादी पक्षाच्या महिला सदस्या, आदिवासी विकास प्रकल्पस्तरीय समिती सदस्या सुनीता भांगरे याना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

    याबाबत समजते की, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळामधील सुविधांचा अभाव अंधाधुंद कारभाराबाबत जिल्हा परिषद सदस्या तसेच आदिवासी विकास प्रकल्प समितीच्या सदस्या सुनीता भांगरे यांनी आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील कारभाराचा पंचनामा केला म्हणून त्याचा राग मनात धरून एका मुख्याध्यापकांच्या भावाकडून मोबाईल नंबरवरून मुतंखेल आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांचा भाऊ बोलतोय सांगून त्यांना फोन करून शिवीगाळ करून, आमच्या वाट्याला जाऊ नका, असे सांगून खूनाची धमकी दिली.

    याबाबत राजूर पोलिसांकडे रितसर फिर्याद देण्यात आली आहे. रामेश्वर गजानन शातलवार (रा.डोंबिवली) यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी सांगितले. आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

    राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा परिषद महिला सदस्यांना खुनाची धमकी देण्यात आल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या महिला सदस्या आक्रमक झाल्या असून, आरोपीस अटक करून कारवाई करावी अशी मागणी महिलांनी केली आहे.