जिल्हा परिषद, पंचायत समिती इच्छुकांची निशिकांत भोसले – पाटील यांच्याकडे गर्दी

सांगली जिल्हा परीषद व वाळवा पंचायत समितीचे नुकतेच आरक्षण जाहीर झाले आहे. निशिकांत भोसले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार्‍या प्रमुख कार्यकर्त्यांनी उमेदवाराठी साकडे घातले. इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी निशिकांत भोसले-पाटील यांनी प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात संवाद साधला.

  इस्लामपूर : सांगली जिल्हा परीषद व वाळवा पंचायत समितीचे नुकतेच आरक्षण जाहीर झाले आहे. निशिकांत भोसले-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार्‍या प्रमुख कार्यकर्त्यांनी उमेदवाराठी साकडे घातले. इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी निशिकांत भोसले-पाटील यांनी प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात संवाद साधला.

  उरुण – इस्लामपूर नगरपरीषद व इस्लामपुर विधानसभा मतदार संघात निशिकांत भोसले- पाटील यांनी भारतीय जनता पक्षाची मोठी ताकद उभा केली आहे. तसेच कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. यामुळे कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढली आहे. होणारी जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुक ही भाजपा पक्षाच्या चिन्हांवर लढण्याचा आग्रह आज दिसुन आला.

  यावेळी इस्लामपुर विधानसभा मतदार संघातील सर्व गावांतील प्रमुख, इच्छुंक उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते. आरक्षणानुसार प्रत्येक मतदार संघातील प्राथमिक मुलाखती भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मागणीनुसार घेण्यात आल्या.

  इस्लामपूर विधानसभा मतदार संघात ७ जिल्हा परीषद व १४ पंचायत समिती मतदार संघ येत असुन अनेक इच्छुक उमेदवारांनी आप आपल्या मतदार संघात बेरचे गणित मांडत विजयचा दावा केला आहे.
  यावेळी निशिकांत भोसले- पाटील यांनी सर्व इच्छुक उमेदवार व कार्यकर्ते यांची मते समजावून घेतली. अनेकांनी भाजपा पक्षाच्या चिन्हावर लढण्याची अपेक्षा व्यक्त केल्याने वरीष्ठ पक्षाच्या प्रभारी यांच्याकडे आपल्या अपेक्षा व प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना पोहचवुन मोठ्या ताकदीने येणार्‍या जिल्हा परीषद व पंचायत समिती निवडणुका लढवुन जिंकण्याच्या दृष्टीने भाजपा पक्ष व मी तुमच्या पाठीशी उभा असल्याचे सांगितले.

  यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे,सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष महावीर चव्हाण,वाळवा तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप,वाळवा तालुका भाजपाचे ओबीसी सेल चे अध्यक्ष मधुकर हुबाले,वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील,भाजपाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत, वाळवा तालुका भाजपाचे उपाध्यक्ष निवास पाटील, सरचिटणीस दादासाहेब रसाळ, यदुराज थोरात, अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थिप होते.