झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने घेतला तरूणीचा किस; कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

झोमॅटोवरून मागविलेले जेवण पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयने तरुणीचे जबरदस्तीने किस घेऊन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका नामांकित सोसायटीत ही घटना शनिवारी रात्री घडली आहे.

  • कोंढवा पोलीस ठाण्यात डिलव्हरी बॉयवर गुन्हा दाखल

पुणे : झोमॅटोवरून मागविलेले जेवण पार्सल घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयने तरुणीचे जबरदस्तीने किस घेऊन तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका नामांकित सोसायटीत ही घटना शनिवारी रात्री घडली आहे. रईस शेख (वय ४०, रा. कोंढवा) असे अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. याबाबत १९ वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तरुणी येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत राहते. तिने शनिवारी रात्री झोमॅटोवरून जेवण मागवले होते. ते पार्सल घेऊन रईस शेख रात्री साडेनऊच्या सुमारास आला होता. जेवणाचे पार्सल दिल्यानंतर त्याने तरुणीला पिण्याचे पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर थँक्यू म्हणण्याचा बहाना करून त्याने तरुणाचा हात धरला.

तरुणीने हात सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने हात घट्ट पकडून जवळ ओढले आणि तिच्या गालाचे दोन वेळा किस घेतला. या सर्व प्रकारानंतर घाबरलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.