झेडपीचे कर्मचारी कारवाईच्या उंबरठ्यावर! सीईओ आव्हाळे यांचे फर्मान ; विभाग प्रमुखांची परवानगी बंधनकारक

झेडपीचे कर्मचारी कारवाईच्या उंबरठ्यावर आले आहेत. सीईओ मनीषा आव्हळे यांनी याबाबत स्वतंत्रदिनाच्या पुर्वसंध्येला फर्मान जारी केले आहे. कार्यालयीन वेळेचा त्यांनी धडा गिरवण्यास सुरुवात केली आहे.बरेच अधिकारी-कर्मचारी हे बऱ्याच वेळी आधी कार्यालयात येतात व कार्यालयीन वेळेनंतर ही रात्री उशीरापर्यंत कार्यालयात थांबतात.

    शेखर गोतसुर्वे, सोलापूर : झेडपीचे कर्मचारी कारवाईच्या उंबरठ्यावर आले आहेत. सीईओ मनीषा आव्हळे यांनी याबाबत स्वतंत्रदिनाच्या पुर्वसंध्येला फर्मान जारी केले आहे. कार्यालयीन वेळेचा त्यांनी धडा गिरवण्यास सुरुवात केली आहे.बरेच अधिकारी-कर्मचारी हे बऱ्याच वेळी आधी कार्यालयात येतात व कार्यालयीन वेळेनंतर ही रात्री उशीरापर्यंत कार्यालयात थांबतात. तसेच सुट्टीच्या दिवशीही बरेच कर्मचारी कार्यालय प्रमुखांच्या पूर्वपरवानगी शिवाय कार्यालयात येत असल्याचे सीईओ आव्हाळे यांच्या निदर्शनास आले आहे.

    सर्व अधिकारी-कर्मचारी यांना परिपत्रकादवारे सूचित करण्यात आले आहे. सर्व खातेप्रमख व त्यांचे अधिनस्त सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी कार्यालयीन कामकाजाचे दिवशी सकाळी 9.30 वाजता उपस्थित राहावे तसेच सायंकाळी 7.00 नंतर कार्यालयात उपस्थित राहावयाचे असल्यास कार्यालय प्रमुखांची पूर्वपरवानगी घेण्यात यावी. तसेच सुट्टीच्या दिवशीही कार्यालय प्रमुखांच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयात उपस्थित राहू नये, अन्यथा एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्यास संबंधितांस जबाबदार धरून कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असे परिपत्रकात म्हटले आहे.

    सीईओ आव्हाळे यांनी शिस्त लावण्याचा धडाका सुरू केला आहे. मुख्यालयात मोकाट फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जरब बसली आहे. रात्री उशिरा पर्यंत कर्मचाऱ्यांकडून कामे केली जातात त्यामुळे झेडपीत कायम वर्दळ दिसून येते. तर सुट्टीच्या दिवशी बांधकाम लघु पाटबंधारे पाणीपुरवठा विभागात कर्मचाऱ्यापेक्षा ठेकेदारांची संख्या सर्वाधीक असते. या सर्व घडामोडी थांबण्याच्या वाटेवर आहेत.