झेडपीचे कृषी अवजारे शेतकऱ्यावर उदार ; योजनेच्या फार्मसाठी दिला खाजगी दुकानाचा पत्ता

विविध योजनांचा राजभर डंका झाल्याचा दावा करणाऱ्या झेडपीने शेतकऱ्यांना औजार घेण्यासाठी अनुदान देण्यात मात्र कृतघज्ञपणा दाखवल्याचे समोर आले आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने 50 टक्के अनुदानावर कृषी औजार घेण्याची योजना जाहीर केली आहे.

    सोलापूर : विविध योजनांचा राजभर डंका झाल्याचा दावा करणाऱ्या झेडपीने शेतकऱ्यांना औजार घेण्यासाठी अनुदान देण्यात मात्र कृतघज्ञपणा दाखवल्याचे समोर आले आहे.
    जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने 50 टक्के अनुदानावर कृषी औजार घेण्याची योजना जाहीर केली आहे. कृषी विभागाने झेडपीच्या वेबसाईटवर या योजनेची माहिती देणारी फोटो अपलोड करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना औजार घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती देण्यात आली आहे व औजारनिहाय अनुदान किती मिळणार? याची रक्कम नमूद केलेली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र फॉर्म देताना कृषी विभागाने शेतकऱ्यावर मोठी मेहरबानी केल्याचे दिसून येत आहे. योजनेचा लाभ घेण्याचे फॉर्म संबंधित पंचायत समिती, ग्रामपंचायतस्तरावर मिळतील, असे नमूद केले आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या समोरील एका झेरॉक्स सेंटरमध्ये हे फॉर्म मिळतील, असे पेनने त्या संबंधित झेरॉक्स सेंटरचा पत्ता लिहिल्याचे दिसून येत आहे. त्या झेरॉक्स सेंटरवर गेल्यावर दहा रुपयाला हा फार्म दिला जात आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यावर ही मेहरबानी केली की, त्या झेरॉक्स सेंटरचा व्यवसाय वाढविला अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कोणत्याही पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतमध्ये हा फॉर्म उपलब्ध नाही. मंद्रूपचे ग्रामसेवक नागेश जोडमोडे यांना फार्म उपलब्ध आहे का? असे विचारले असता आम्हाला या योजनेबाबत काही कळविण्यात आले नाही असे सांगितले आहे. मग या योजनेच्या फॉर्ममध्ये कृषी विभागाचे कमिशन किती? अशी आता चर्चा होऊ लागली आहे.

    आयटीसेल कशाला आहे?

    जिल्हा परिषदेतच्या विविध विभागाची माहिती वेळोवेळी वेबसाईटवर अपलोड करणे व इतर कामासाठी झेडपी मध्ये स्वतंत्र आयटीसेल आहे. या आयटीसेलने कृषी विभागाने दिलेल्या पत्राचा फोटो काढून जसाच्या तसा अपलोड केल्याचे दिसून येत आहे. लोकांना चांगली सेवा देण्याचा डंका मिरविणाऱ्या प्रशासनाने या माहितीबरोबर फॉर्मही अपलोड केला असता तर शेतकऱ्यांची सोय झाली असती. याशिवाय ऑनलाइन मागणी अर्ज भरून घेण्याची सुविधा दिली असती तर आणखी शेतकऱ्यांचे काम सुकर झाले असते. आयटीसेलच्या कर्मचाऱ्यांबाबत आमदारांनी तक्रार करूनही दहा वर्षे ते झेडपीच्या मुख्यालयात ठाण मांडून आहेत. प्रशासनाने नुकत्याच वादग्रस्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या पण या कर्मचाऱ्यावरही मेरबानी दाखवल्याची तक्रार आहे. आयटीसेलचे कर्मचारी दिवसभर “साहेबां’च्या मागे फिरत असतात. लोकांसाठी सुविधा देण्यासाठी त्यांनी डोकं वापरलं तर बरं होईल, अशी प्रतिक्रिया झेडपीच्या एका ज्येष्ठ सदस्याने व्यक्त केली.

    जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती मध्ये अवजारे घेण्यासाठी फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे फॉर्म हा विनामूल्य आहे जिल्हा परिषद सेस फंडातून दोन कोटी 89 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे विवेक कुंभार जिल्हा कृषी विकास अधिकारी