निशिकांत कामत व्हेंटिलेटरवर, निधनाची बातमी खोटी : रितेश देशमुख

निशिकांत कामत यांना ३१ जुलैला कावीळ आणि पोट फुगल्याने हैदराबादच्या रूग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी सांगतल्यानुसार त्यांच्या यकृतात दुय्यम संसर्ग होता, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. त्यांची संसर्गाशी झुंज सुरुच आहे.

दिग्दर्शक निशिकांत कामत हैदराबादमधील रुग्णालयात मृत्यूशी झूंज देत आहेत. अशा आशयाचे ट्विट अभिनेता रितेश देशमुख यांनी केले आहे. तसेच त्याच्या मृत्यूची बातमी खोटी आहे. असे सांगितले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना करा असेही रितेश देशमुख याने म्हटले आहे. निशिकांत कामत हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना यकृताचा संसर्ग झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. 

निशिकांत कामत यांना ३१ जुलैला कावीळ आणि पोट फुगल्याने हैदराबादच्या रूग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी सांगतल्यानुसार त्यांच्या यकृतात दुय्यम संसर्ग होता, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. त्यांची संसर्गाशी झुंज सुरुच आहे. 

निशिकांत कामत यांनी अजय देवगन, तब्बूचा सुपरहिट ‘ दृष्यम ‘ आणि इरफान खानचा बॉलिवूडमधील ‘ मदारी ‘ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. या व्यतिरिक्त त्यांनी जॉन अब्राहमचे २ चित्रपट ‘फोर्स’ आणि ‘रॉकी हँडसम’ चे दिग्दर्शनही केले.