गणेशोत्सव साजरा करताना खबदारी बाळगा : जिल्हाधिकारी संजय यादव

विघ्नहर्ता गणरायाचे शनिवार २२ ऑगस्ट २०२० पासून सर्वत्र आगमन होत आहे. यामुळे नवचैतन्य निर्माण झाले असून या नवचैतन्याच्या शक्तीचा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावा.

धुळे : विघ्नहर्ता गणरायाचे शनिवार २२ ऑगस्ट २०२० पासून सर्वत्र आगमन होत आहे. यामुळे नवचैतन्य निर्माण झाले असून या नवचैतन्याच्या शक्तीचा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावा. धुळेकर नागरिकांनी गणेशोत्सव साजरा करताना खबरदारी बाळगावी, अशा शब्दांत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे, गणेशोत्सवामुळे आबालवृध्दांमध्ये नवचैतन्याचे वातावरण असते. मात्र, यंदा कोरोना विषाणूने सर्वांनाच जखडून ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी दक्षता बाळगणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव घरातील वृध्द व्यक्ती, बालकांना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो टाळण्यासाठी नागरिकांनी घरात आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. हात साबणाने नियमितपणे धुवावेत किंवा सॅनेटायझरचा वेळोवेळी वापर करावा. घराबाहेर पडताना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर अवश्य करावा. याशिवाय राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. नागरिक राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करतील, अशी अपेक्षा विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाने करू या, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.