राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस, मराठवाड्यात यलो अलर्ट जारी

मराठवाडा विभागात दहा ते बारा दिवसापूर्वी जोरदार पाऊस झाला होता. काही भागात अतिवृष्टी आणि काही जिल्ह्यात ढग फुटी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. औरंगाबाद जिल्ह्यात या पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. याची झळ जिल्ह्यातील सव्वा तीन लाख शेतकऱ्यांना बसली आहे.

    औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाडा विभागात पावसासाठी वातावरण अनुकूल बनले असून हवामान खात्याने 20 ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह पावस होण्याच्या शक्यतेमुळे नागरिकांनी विशेषता शेतकऱ्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशानसातर्फे करण्यात आले आहे.

    मराठवाडा विभागात दहा ते बारा दिवसापूर्वी जोरदार पाऊस झाला होता. काही भागात अतिवृष्टी आणि काही जिल्ह्यात ढग फुटी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. औरंगाबाद जिल्ह्यात या पावसाने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले. याची झळ जिल्ह्यातील सव्वा तीन लाख शेतकऱ्यांना बसली आहे.

    मराठवाडा विभागात 20 सप्टेंबर रोजी संभाजीनगर जिल्ह्यासह जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात येलो अलर्ट दर्शवला असून लातूर, धाराशिव हे जिल्हे वगळता उपरोक्त सहा जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.